लग्नाचा फोटो शेअर करत अनुपम खेर यांनी किरण खेरला दिल्या शुभेच्छा

लग्नाचा फोटो शेअर करत अनुपम खेर यांनी किरण खेरला दिल्या शुभेच्छा

लग्नाचा फोटो शेअर करत अनुपम खेर यांनी किरण खेरला दिल्या शुभेच्छा

बॉलिवूडममधील सर्वात चर्चीत तसेच दिग्गज कपल म्हणजे किरण खेर(Kirron Kher) आणि अनुपम खेर(Anupam Kher). चित्रपटात काम करता करता किरण खेर यांचे अभिनेते अनुपम खेर यांच्याशी सुर जुळले आणि दोघांनी लग्न केले. किरण खेर यांचे पूर्व पतीसोबत काही खटके उडत असल्याने  त्यांचा संसार काहीसा डगमगत होता. याच दरम्यान त्यांची अनुपम खेर यांच्याशी भेट झाली आणि त्यांना अमुपम खेर यांच्यावर प्रेम जडले. अमुपम यांची काहाणी देखील अशीच असल्याने दोघांमध्ये जवळीक वाढली. आणि त्यांनी लग्न करायचे ठरवले. आज किरण आणि अनुपम त्यांच्या लग्नाचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्त अनुपम खेर यांनी लग्नाचा एक जुना थ्रोबॅक फोटो शेअर करत किरण यांना  शुभेच्छा दिल्या आहे.(Anupam Kher wished Kirron Kher on marriage anniversary)”36 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय किरण. हास्य, अश्रू, वाद, भावनिक क्षण, मैत्री, प्रेम  या सर्व भावनांसह आपन एक लांबचा प्रवास केला आहे! तसेच हा प्रवास अत्यंत महत्वपूर्ण आहे. या ब्लॅक अँन्ड व्हाईट फोटमध्ये रंगांच्या सर्व छटा आहेत. सुरक्षित आणि निरोगी राहा. खूप सारं प्रेम आणि प्रार्थना नेहमी!”

किरण खेर आणि अनुपम खेर दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. किरण करिअर करण्यासाठी मुंबईत आल्या आणि गौतम बेरी या बिझिनेस मॅनच्या प्रेमात पडल्या. त्यांना सिकंदर नावाचा एक मुलगा झाला. मात्र त्यांचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. दोघेही त्याच्या आयुष्यात खुश नव्हते. अनुपम खेर यांच्याशी भेट झाल्यानंतर किरण खेर यांनी गौतम बेरी यांना घटस्फोट देऊन अनुपम खेर यांच्याशी विवाह केला. तर दुसरीकडे अनुपम खेर यांचेही लग्न झाले होते. मात्र तेही त्यांच्या आयुष्यात खुश नव्हते. त्यामुळे अनुपम खेर आणि किरण यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १९८५मध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले.


हे हि वाचा – नुसरत जहाँ यांनी दिली गुडन्यूज; गोंडस बाळासा दिला जन्म

First Published on: August 26, 2021 2:18 PM
Exit mobile version