घरताज्या घडामोडीनुसरत जहाँ झाली आई, पण पती म्हणतो हे मुल माझं नाही

नुसरत जहाँ झाली आई, पण पती म्हणतो हे मुल माझं नाही

Subscribe

पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ (Nusrat Jahan) आई झाल्या आहेत. त्यांनी गोंडस मुलाला जन्म दिला आहे. २५ ऑगस्टला नुसरत जहाँ यांना कोलकाताच्या Neotia रुग्णालयात दाखल केले होते. नुसरत जहाँ यांच्यासोबत अभिनेता यश दासगुप्ता होता. दरम्यान डिलिव्हरी पूर्वी नुसरत जहाँ यांनी आपला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या लेटेस्ट फोटोमध्ये त्या पूर्णपणे बदलल्या दिसत आहेत. हा नवा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले होते की, ‘Faith Over Fear #positivity #morningvibes.’ नुसरत जहाँ आई बनल्यामुळे सध्या चाहते आणि सेलिब्रिटी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मात्र नुसरत जहाँ यांच्या पतीने मुल स्विकारण्यास नकार दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nusrat (@nusratchirps)

- Advertisement -

दरम्यान नुसरत जहाँ गर्भवती असल्यापासून खूप साऱ्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. ज्यानंतर नुसरत जहाँ यांनी गर्भवती असल्याच्या बातमी दुजोरा दिला. पण जेव्हा नुसरत जहाँ या गर्भवती असल्याचा खुलासा झाला त्यावेळी त्यांचा पत्नी निखिल जैन याच्यासोबतच्या लग्नासंबंधित चर्चेला चांगलेच उधाण आले.

निखिल जैनने नुसरत जहाँ यांच्यासोबत २०१९मध्ये लग्न केले होते. परंतु तणावानंतर आता दोघे २०२१मध्ये विभक्त झाले आहेत. तसेच निखिल जैनने या बाळाचा देखील स्वीकार केला नाही आहे.

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वी निखिल जैन म्हणाला होता की, त्यांचे लग्न तुटण्याच्या मार्गावर आहे. गेल्या ६ महिन्यांपासून निखिल नुसरतसोबत राहत नाही आहे आणि अशात नुसरत जहाँ गर्भवती आहेत. पण हे बाळ निखिलने आपले मानण्यास नकार दिला आहे. निखिल पुढे म्हणाला की, ‘बऱ्याच काळापासून नुसरत आणि त्याच्या संपर्क झाला नाही आहे.’ त्यामुळे पतीपासून वेगळे राहूनही नुसरत कशी गर्भवती झाली? याबाबत प्रश्न उपस्थितीत केले जात होते.

त्यानंतर नुसरत जहाँ निखिल जैनसोबतच्या रिलेशनशिपविषयी म्हणाल्या की, ‘परदेशी भूमी असल्याने तुर्की मॅरेज रेग्युलेशननुसार आमचा विवाह अवैध आहे. यासोबतच हा एक दोन वेगळ्या विभिन्न धर्मीय व्यक्तींमधील विवाह असल्याने त्याला भारतात कायदेशीर मान्यता मिळवण्याची आवश्यकता होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे कायदेशीर रित्या हा विवाह वैध नाही आहे. हे केवळ एक नाते किंवा लीव्ह इन रिलेशनशिप आहे. त्यामुळे विभक्त होण्यासाठी कोणत्याही घटस्फोटाची गरजच नाही, असे स्पष्ट केले होते.


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -