मास्क – सॅनिटायझर आणि अॅक्शन…लॉकडाऊनमध्ये पार पडलं ‘या’ चित्रपटाचं शुटींग

मास्क – सॅनिटायझर आणि अॅक्शन…लॉकडाऊनमध्ये पार पडलं ‘या’ चित्रपटाचं शुटींग

मनाचे श्लोक

कोरोना व्हायरसमुळे देशात गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून लॉकडाउन सुरु आहे. या काळात सारं काही बंद असल्यामुळे कलाविश्वातील कामकाजही ठप्प झालं होतं. त्यामुळे कधीही न थांबणारी मनोरंजनसृष्टी या लॉकडाउनच्या काळात बंद झाली होती. मालिका, चित्रपटांचे शुटींग बंद झाले होते. मात्र आता लॉकडाउनच्या अटी शिथील केल्यामुळे हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. विशेष म्हणजे या अनलॉकमुळे पुन्हा एकदा मनोरंजनसृष्टी जोमाने उभी राहिली आहे. त्यामुळे लॉकडाउननंतर मराठी कलाविश्वातील ‘मनाचे श्लोक’ हा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मृण्मयी देशपांडे दिग्दर्शिक ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाचं जवळपास संपूर्ण चित्रीकरण पूर्ण झालं होतं. मात्र या चित्रपटातील काही महत्त्वाच्या भागांचं शेवटच्या दोन दिवसांमध्ये चित्रीकरण करायचं होतं. त्यानंतर हा संपूर्ण चित्रपट तयार होणार होता. मात्र अखेरच्या या दोन दिवसांमध्येच लॉकडाउनची घोषणा करण्यात आली त्यामुळे हे चित्रीकरण अर्ध्यावर राहिलं होतं. मात्र अनलॉक होताच चित्रपटाच्या टीमने योग्य काळजी घेत हे चित्रीकरण पूर्ण केलं आहे. अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडेने फेसबुकवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

दरम्यान, या चित्रीकरणावेळी नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यात आलं होतं. सेटवर संपूर्ण टीम एकाच वेळी येऊ शकत नसल्यामुळे एका माणसाने चक्क तीन माणसांची जबाबदारी पेलली. तसंच या काळात प्रत्येकाने मास्क आणि सॅनिटायझरचा वापर केला. मनाचे श्लोकचं मुळशी रोडवरील गरुड माची या गावात चित्रीकरण झालं असून चित्रीकरणानंतर संपूर्ण गाव सॅनिटाइज करण्यात आलं.


हे ही वाचा – ‘त्या’ तीन साधूंनी महिलेवर एकदा नाही तर सलग सातवेळा केला बलात्कार!


 

First Published on: June 22, 2020 3:28 PM
Exit mobile version