घरताज्या घडामोडी'त्या' तीन साधूंनी महिलेवर एकदा नाही तर सलग सातवेळा केला बलात्कार!

‘त्या’ तीन साधूंनी महिलेवर एकदा नाही तर सलग सातवेळा केला बलात्कार!

Subscribe

या महिलेनं तक्रार केल्यानंतर या तिनही साधुंना अटक करण्यात आली आहे. अमरेली जिल्हा पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

राजस्थाननंतर आता गुजरातच्या अमरेली परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. मंदिरातील तीन साधूंनी एका महिलेवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या साधूंविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकदा नाही तर तब्बल सातवेळा या महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. या महिलेनं तक्रार केल्यानंतर या तिनही साधुंना अटक करण्यात आली आहे. अमरेली जिल्हा पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

महिले आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, मजुरीच्या नावाखाली या साधुंनी आपले शोषण केले. यानंतर पोलिसांनी या महिलेची मेडिकल टेस्ट केली आहे.  त्याचे रिपोर्ट येणे बाकी आहे. पोलीस सध्या या साधुंनी आणखी कोणत्या महिलांवर जबरदस्ती तर केली नाही ना, याचा शोध घेत आहेत.

- Advertisement -

राजस्थानमध्ये जैन साधुचा गर्भवती महिलेवर बलात्कार

याआधी राजस्थानच्या करौली जिल्ह्यात एका गर्भवती महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एका जैन साधूला अटक करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे या साधूकडून पोलिसांनी 33 पेन ड्राईव्ह, कंडोम पॅकेट आणि दोन लॅपटॉप जप्त केले आहेत. या वस्तू पोलिसांना सामुदायिक आश्रय निवासात एका मोठ्या बॅगमध्ये सापडल्या. या बॅगमध्ये तब्बल १९  मोबाईल फोन,  दोन लॅपटॉप, चार हार्ड डिस्क, कंडोम पॅकेट्स आणि ३३ पेन ड्राईव्ह होते. दरम्यान पोलिसांनी मिळालेली हार्ड डिस्क स्कॅन केल्यानंतर यात त्यांना अश्लील व्हिडीओ आढळून आले.


हे ही वाचा – ‘त्या’ दोघांनी वडिलांची हत्या करण्यासाठी ‘फादर्स डे’ हा दिवस निवडला!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -