बेल बॉटम सिनेमावर या देशात बंदी, काय आहे कारण?

बेल बॉटम सिनेमावर या देशात बंदी, काय आहे कारण?

बेल बॉटम सिनेमावर या देशांत बंदी, काय आहे कारण?

खिलाडी अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुप्रतिक्षित बेल बॉटम (Bell Bottom) सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. कोरोना काळात हा सिनेमा प्रदर्शित होण्यापासून दूर राहिला मात्र या आठवड्यात बेल बॉटम थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला. भारतात या सिनेमाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. सिनेमातील सर्वच कलाकारांचे प्रेक्षकांनी भरभरुन कौतुक केले. सिनेमात अक्षय कुमार, लारा दत्त, हुमा कुरेशी आणि वाणी कुमार यांनी दमदार अभिनय केला आहे. लारा दत्त हिने साकारलेली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका प्रेक्षकांच्या प्रामुख्याने प्रसिद्धीस उतरली. भारतात सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र काही देशांनी बेल बॉटम हा सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी बंदी घातली आहे. या बंदीमुळे सिनेमाच्या संपूर्ण कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. याच कारण नेमक काय? जाणून घ्या. (Bell Bottom Movie is banned in Saudi Arabia, Qatar and Kuwait)

बेल बॉटम सिनेमाच्या मध्यातरानंतरच्या भागात अपहरण करणारे विमान लाहोरहून दुबहईला येताना दाखवण्यात आले आहे. ही घटना १९८४ मध्ये घडलेली सत्य घटना आहे. त्यावेळी संयुक्त अरब अमीरातचे संरक्षण मंत्री शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी ही गोष्ट वयक्तिक पातळीवर हाताळली होती आणि संयुक्त अरब अमीरातीच्या अधिकाऱ्यांनी अपहरणकर्त्यांना पकडले होते. मात्र सिनेमात या घटनेत भारतीय अधिकाऱ्याला नायक म्हणून दाखवण्यात आले होते.

सिनेमात अक्षय कुमार अपहरकर्त्यांना पकडण्यासाठी प्लॉनिंग करतो आणि संयुक्त अरब अमीरातीच्या संरक्षण मंत्र्यांना याची माहिती देत नाही असे दाखवण्यात आले आहे. या कारणामुले मध्य पू्र्व देशातील सेन्सॉर बोर्डाने यावर आक्षेप घेत सैदी अरब, कतार आणि कुवेत मध्ये बेल बॉटम या सिनेमावर बंदी घातली आहे.


हेही वाचा – Tiger 3 च्या शुटींगला निघालेल्या सलमानला विमानतळावर CISF च्या जवानाने अडवले

First Published on: August 20, 2021 7:35 PM
Exit mobile version