घरताज्या घडामोडीTiger 3 च्या शुटींगला निघालेल्या सलमानला विमानतळावर CISF च्या जवानाने अडवले

Tiger 3 च्या शुटींगला निघालेल्या सलमानला विमानतळावर CISF च्या जवानाने अडवले

Subscribe

CISF च्या जवानाची भूमिका पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (katrina kaif)  लवकरच टायगर ३ (Tiger 3) या त्यांच्या आगामी सिनेमात एकत्र दिसणार आहेत. टायगर ३ च्या शुटींसाठी संपूर्ण टीम रशियाला रवाना झाली आहे. (Salman Khan going to russia for Tiger 3 Movie Shooting) नुकतेच सलमान आणि कतरिनाला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले. भाईजानला पाहण्यासाठी मुंबई विमानतळावर चाहत्यांची मोठी गर्दी पहायला मिळाली. रशियाला निघालेल्या सलमानला मुंबई विमानतळावर एंट्री करताच CISF च्या जवानाने अडवले आणि काही वेळातच त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

मुंबई विमानतळावर सलमान खान आपल्या सिक्युरिटीला घेऊन पोहचला होता. मात्र सलमानच्या सिक्युरिटीचा कोणताही विचार न करता CISFच्या जवानाने सलमानला एंट्री गेटवरच अडवलेय. सलमानच्या फॅन्ससमोर त्याला अडवल्याने फॅन्सने आवाज केला मात्र ‘सलमानच्या स्टारडमचा मला काही फरक पडत नाही. मी माझे काम करत आहे. सलमान खानची चेकींग केल्याशिवाय मी त्याला आत सोडू शकत नाही. सलमान खानला चेकिंगसाठी थांबावेच लागेल’, असे CISFच्या जवानाने म्हटले. त्यावर सलमानने देखील त्याला त्याचे काम करु द्या असे सांगितले. हा संपूर्ण प्रकार मीडियाच्या कॅमेरात कैद झाला आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

CISF च्या जवानाची भूमिका पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. आपल्या कामाशी प्रामाणिक असल्याचे म्हणत अनेकांनी शाबासकी देखील दिली आहे.

मुंबई विमानतळावर सलमान खान सोबतच कतरिना कैफला देखील स्पॉट करण्यात आले. कतरिना देखील टायगर ३च्या सुटींगसाठी रशियाला जाण्यासाठी फारच उस्तुक दिसली. रशियाला जाण्यासाठी कतरिना संपूर्ण तयारीत विमानतळार आली होती.

सलमान कतरिना सोबत अभिनेत्री भूमी पेडणेकरला देखील मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले. यावेळी भूमीने ब्लॅक कलरचा जॅकेट सूट सोबत व्हॉइट कलरचे शूज घातले होते.


हेही वाचा – Super Dancer 4 सेटवरती एंट्री करताच शिल्पा ढसाढसा रडली

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -