‘चलो बुलावा आया है’ फेम गायक नरेंद्र चंचल यांचं निधन

‘चलो बुलावा आया है’ फेम गायक नरेंद्र चंचल यांचं निधन

'चलो बुलावा आया है' फेम गायक नरेंद्र चंचल यांचं निधन

भजन सम्राट लोकप्रिय गायक नरेंद्र चंचल (Narendra Chanchal) यांचे आज (शुक्रवार) निधन झाले. दिल्लीत अपोलो रुग्णालयात दीर्घकालीन आजारामुळे त्यांचे निधन झाले आहे. नरेंद्र चंचल यांनी ८०व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. माहितीनुसार गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी १२च्या सुमारास त्यांचे निधन झाले.

१६ ऑक्टोबर १९४० मध्ये नरेंद्र चंचल यांचा जन्म अमृतसरच्या नमक हांडीमध्ये झाला. धार्मिक वातावरणात ते लहानाचे मोठे झाले. कठोर परिश्रम केल्यानंतर त्यांना बॉलिवूडमध्ये काम मिळाले. त्यांनी ‘बॉबी’, ‘बेनाम’ आणि ‘रोटी कपडा और मकान’ यासारख्या अनेक चित्रपटात गाणी गायली आहेत. Midnight Singerमध्ये त्यांनी आपल्या प्रवासाबद्दल सर्व काही लिहिले आहे. नरेंद्र चंचल दरवर्षी २९ डिसेंबरला वैष्णो देवीला जात होते आणि वर्षाच्या शेवटीच्या दिवशी ते परफॉर्मन्स करत होते.

नरेंद्र चंचल यांच्या निधनाची बातमी समोर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘लोकप्रिय भजन गायक नरेंद्र चंचल यांच्या निधनाबाबत समजताच खूप दुःख झाले. त्यांनी भजन दुनियेत आपल्या विशिष्ट आवाजाने ओळख बनवली आहे. या दुःखात मी त्यांच्या कुटुंबियांसोबत आहे. ओम शांती!’

भारतीय संघातील क्रिकेटर हरभजन सिंह याने देखील ट्विट करून शोक व्यक्त केला आहे.

 


हेही वाचा – जावेद अख्तर यांची बदनामी केल्याप्रकरणी कंगनाला समन्स


 

First Published on: January 22, 2021 3:01 PM
Exit mobile version