Bhool Bhulaiyaa 2 : ‘भूल भुलैया २’ चा जबरदस्त टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

Bhool Bhulaiyaa 2 : ‘भूल भुलैया २’ चा जबरदस्त टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

'भूल भुलैया २' चा जबरदस्त टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

राज्यातील चित्रपटगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरु करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. यानंतर अनेक बॉलिवूड चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटांच्या रिलीज डेटच्या घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. अशातच अभिनेता कार्तिक आर्यन याच्या बहुचर्चित भूल भुलैया २ ची रिलीज डेटही जाहीर केली आहे. नुकताच कार्तिकने चाहत्यांसमोर चित्रपटाचा धमाकेदार हॉर टीझर रिलीज केला आहे.

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट पुढील वर्षी २५ मार्च २०२२ ला चित्रपटगृहात रिलीजसाठी सज्ज आहे. अशातच कार्तिकने चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज केल्याने चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे.

कार्तिक आर्यनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून चाहत्यांसाठी  ‘भूल भूलैया 2’चा टीझर शेअर केला. या टीझरमध्ये कार्तिक एकदम डॅशिंग बाबाच्या अंदाजात घुमटावर बसलेला दिसत आहे. या टीझरमधील कार्तिक आर्यनच्या लूकबद्दल सांगयचे झाल्यास त्याने डोळ्यांवर चष्मा, गळ्यात आणि हातात माळा घातलेल्या आहेत, यासह, गरुड आजूबाजूला उडताना दिसत आहेत.

‘भूल भूलैया 2’ चित्रपटाच्या टीझरच्या सुरुवातीला आधी चंद्र दिसायला सुरुवात होते आणि नंतर कार्तिक अंधाराच्या प्रकाशात दिसतो. त्याच्या पार्श्वभूमीवर एका विचित्र, भीतीदायक आवाजासह, भुल भुलैयाच्या ट्रॅकचे संगीत ऐकू येते. टीझरमध्ये कार्तिकच्या चेहऱ्यावर खूप आत्मविश्वास दिसत आहे. टीझर शेअर करताना कार्तिकने लिहिले आहे की, तुम्ही चित्रपट जवळच्या सिनेमागृहांमध्ये पाहू शकता. यावर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.


First Published on: September 28, 2021 6:25 PM
Exit mobile version