घरमनोरंजनcolorism in bollywood : सावळ्या रंगामुळे हिना खान वर्णभेदाची शिकार

colorism in bollywood : सावळ्या रंगामुळे हिना खान वर्णभेदाची शिकार

Subscribe
कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींना आत्तापर्यंत वर्णभेदाचा सामना करावा लागला आहे. बॉलिवूडमध्ये आत्ता सर्वात टॉपची अभिनेत्री प्रियांका चोप्रापासूनते अगदी कोरिओग्राफर रेमो डिसूजा अशा अनेक कलाकारांना या दिव्यातून जावे लागले होते. यातच आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान हिला देखील वर्णभेदाचा अनुभव आला आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून हिना खानला खरी लोकप्रियता मिळाली. मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचताना हिनाला सावळ्या रंगामुळे डावलण्यात आल्याचं समोर आलं आहे. अलिकडेच एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत तिने याविषयी भाष्य केलं आहे.

यावेळी बोलताना हिनाने सांगितले की, सावळ्या रंगामुळे तिला काश्मिरी मुलीची भूमिका नाकारण्यात आली. सावळ्या रंगामुळे अनेकदा तिला नकाराचा सामना करावा लागला. तिला एका चित्रपटाची ऑफर आली होती. परंतु केवळ सावळ्या रंगामुळे तिला चित्रपटातील काश्मिरी मुलीची भूमिका मिळाली नाही, असंही ती या मुलाखतीत म्हणाली.

हिना खानने त्या चित्रपटाबद्दल सांगितले नाही पण तिने त्यावेळच्या आठवणी शेअर करत सांगितले की, सावळा रंग असल्याने ती एका काश्मिरी मुलीसारखी गोरी दिसत नव्हती त्यामुळे तिला एका प्रोजेक्टसाठी नकार देण्यात आला. तिला फार वाईट वाटले कारण जेव्हा भाषा कळते तेव्हा तुम्ही भूमिका अधिक चांगल्या प्रकारे साकारू शकतात. मात्र रंगामुळे तिला नाकारण्यात आले, मात्र आशा न सोडता तिने नेहमी प्रयत्न करत राहीन. असा निश्चय हिनाने केला.

- Advertisement -

नुकताच हिनाचा ‘मैं भी बर्बाद’ एक म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित झाला. यात हिनासोबत अंगद बेदी झळकतेय. या म्युझिक व्हिडीओमधील तिच्या लूकचे विशेष कौतुक होत आहे. हिनाने विक्रम भट्ट यांच्या ‘हॅक’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात हिना खान सोबत मोहित मल्होत्रा आणि रोहन शाह मुख्य भूमिकेत दिसले होते. आता लवकरच हिना तिच्या आगामी बॉलिवूड चित्रपटाची घोषणा करणार आहे.


कोरिओग्राफर शक्ती मोहन नीरज चोप्राच्या पडली प्रेमात


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -