‘तू मला प्रेरणा दिलीस’, 11 वर्षीय क्लायमेट वॉरियर काव्या मजुमदावर Bhumi Pednekar इंप्रेस

‘तू मला प्रेरणा दिलीस’, 11 वर्षीय क्लायमेट वॉरियर काव्या मजुमदावर Bhumi Pednekar इंप्रेस

तू मला प्रेरणा दिलीस', 11 वर्षीय क्लायमेट वॉरियर काव्या मजुमदावर Bhumi Pednekar इंप्रेस

अभिनेत्री भूमी पेडणेकरने पडद्यावर आव्हानात्मक आणि रोमांचक भूमिका साकारून मनोरंजन विश्वात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. खऱ्या आयुष्यात या प्रतिभावंत बॉलिवूड अभिनेत्रीने हवामान बदल आणि शाश्वत जीवनशैलीची गरज यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी वाहून घेतले आहे. भूमीची सध्या इन्स्टाग्रामवर मुलाखतींची एक मालिका सुरू आहे. यामध्ये ती छोट्या हवामान योद्ध्यांसोबत गप्पा मारते. याचा भाग म्हणून भूमीने ११ वर्षीय काव्या मजुमदारशी संवाद साधला. लोकांना अधिक शाश्वत पद्धतीने जगून पृथ्वीच्या रक्षणात सहभागी होण्यास प्रोत्साहन देणारे ‘नज’ नावाचे एक अँप काव्याने विकसित केले आहे. या अँपमध्ये काही काळजीपूर्वक निवडलेली आव्हाने आहेत. ही आव्हाने यूजर्सना ऊर्जा व पाण्याची बचत करण्यास, पुनर्वापर व रिसायकलिंगला प्रोत्साहन देण्यास, आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगिकारण्यास तसेच वाया जाणारे अन्न व कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यास प्रेरणा देतात.

हवामान बदलाची समस्या हाताळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जाऊ शकतो यावर काव्याला बोलते केल्यानंतर, भूमी, या छोट्याशा मुलीच्या बुद्धिमत्तेने अवाक झाली. ती काव्याला म्हणाली, ‘तू आज मला खरोखरंच प्रेरणा दिली आहेस. मी जेव्हा तुझ्यासारख्या छोट्या क्लायमेट वॉरियर्सशी बोलते, तेव्हा अजून खूप काही करण्यासारखे आहे, अशी आशा मला वाटते. हा प्रवास कठीण आहे, दीर्घ आहे पण आपण योग्य मार्गावर आहोत. आपल्या संभाषणाने आणखी बऱ्याच छोट्या प्रतिभावंतांना पुढे येण्यासाठी व या कामात योगदान देण्याची प्रेरणा मिळेल अशी आशा मला खरोखर वाटते.”

 

काव्या मजुमदारने व्हाइटहॅट ज्युनियरमध्ये कोडिंग शिकत असून, तेथील तिच्या प्रकल्पाचा भाग म्हणून तिने ‘नज’ हे वर्तनात्मक अर्थशास्त्रातील नज सिद्धांतवर आधारित अँप विकसित केले आहे. नज सिद्धांतामध्ये सकारात्मक सशक्तीकरण आणि अप्रत्यक्ष सूचना यांचा उपयोग करून व्यक्तीच्या वर्तनावर व निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकला जातो. या अँपमधील सर्व दैनंदिन आव्हाने यूजर्सना नैसर्गिक संसाधनांची बचत करण्यात, पुनर्वापर तसेच साहित्याच्या रिसायकलिंगला बढावा देण्यात तसेच आरोग्यपूर्ण जगण्यात व अन्न वाया न जाऊ देण्यात मदत करतील अशा रितीने काळजीपूर्वक निवडण्यात आली आहेत. याशिवाय प्रत्येक आव्हानात एक लिंक दिलेली आहे. या लिंकवर जाऊन यूजर्स त्या विशिष्ट विषयाबद्दल अधिक जाणून घेऊ शकतात. यूजर्स यात पॉइंट्स मिळवू शकतात आणि अँपचे लीडरबोर्ड फीचर वापरून आपल्या गुणांची तुलना अन्य यूजर्सच्या गुणांशी करू शकतात.

काव्याच्या भविष्यकाळातील योजना आणि पर्यावरणाच्या रक्षणाबद्दल तिला वाटणारी कळकळ यांची छाप भूमीवर खूपच पडली. काव्याच्या हवामान बदलाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या या प्रयत्नात सहभाग घेण्याचे आवाहन तिने लोकांना केले. ती म्हणाली, ‘आपण करत असलेल्या प्रत्येक छोट्या कृतीचा परिणाम होतो आणि शाश्वत जीवनशैली म्हणजे नेमके हेच आहे. आपल्या कृतींनी काय नुकसान होऊ शकते याची जाणीव ठेवणे आणि त्या कृती टाळणे. काव्यासारख्या छोट्या क्लायमेट वॉरियर्सने केलेल्या कामापासून अधिकाधिक छोटी मुले प्रेरणा घेतील आणि पृथ्वीला वाचवण्याच्या कामात मदत करतील’, अशी आशा मला वाटते.


हेही वाचा – World Nature Conservation Day: भूमी पेडणेकरला सतावतेय निसर्गाची चिंता, म्हणाली ‘आपण स्वार्थी आहोत’

First Published on: January 13, 2022 8:45 PM
Exit mobile version