घरताज्या घडामोडीWorld Nature Conservation Day: भूमी पेडणेकरला सतावतेय निसर्गाची चिंता, म्हणाली 'आपण स्वार्थी...

World Nature Conservation Day: भूमी पेडणेकरला सतावतेय निसर्गाची चिंता, म्हणाली ‘आपण स्वार्थी आहोत’

Subscribe

मनुष्य जात स्वार्थी आहे. निसर्ग आणि संसाधनांचा आपण नेहमी दुरुपयोग करतो हे आपण नेहमी विसरुन जातो.

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar)  निसर्ग प्रेमी असल्याचे सर्वांना माहिती आहे.  क्लायमेट वॉरियर म्हणून भूमी पेडणेकर अनेकदा निसर्गाविषयी चिंता व्यक्त करताना दिसते. आज जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त भूमीने तिच्या निसर्गाप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत.भूमीच्या या मतांवरुन भूमीचे निसर्गावर असलेले प्रेम पुन्हा एकदा दिसून आले आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, भूमीने निसर्गाच्या होणाऱ्या हानीविषयी चिंता व्यक्त केली आहे. भूमी पेडणेकरने म्हटले आहे की, आपण आपल्या पृथ्वीला अशा ठिकाणी ढकलले आहे तिथे गोष्टी आपल्या हाताबाहेर गेल्या आहेत. आपल्या स्वार्थासाठी निसर्गावर अन्याय केलाय. त्याचा प्रत्येय आपल्याला वेळोवेळी येत आहे. जर्मनी,चीन सारखे देश नैसर्गिक आपत्तीचा सामना करत आहेत. महाराष्ट्रातही अचानक येणाऱ्या पूरामुळे जिवीत हानी झाली आहे. परिस्थिती खूप वाईट आहे. अमेरिकेच्या जंगलात आग लागते, कॅनडामध्ये उष्णतेची लाट आली आहे. सगळ्या गोष्टी नियंत्रणा बाहेर चालल्या आहेत. येणाऱ्या नव्या पिढीसाठी ही गोष्ट फार वाईट आहे, असे भूमीने म्हटले आहे. (World Nature Conservation Day: actress Bhumi Pednekar worried about nature, says ‘we are selfish’)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

- Advertisement -

भूमीने पुढे असे म्हटले आहे की, आज जागतिक निसर्ग संवर्धन दिना दिवशी आपल्या हातात जे काही आहे ते सुरक्षित ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्या निसर्गाचे संवर्धन करणे हे आपल्या पुढच्या पिढीसाठी आपले कर्तव्य आहे. सर्वसामान्य जनता आणि राजकीय नेत्यांना हे कळणे महत्त्वाचे आहे की, आपल्या विकासासाठी निसर्गाची होणारी हानी योग्य नाही. निसर्ग आणि निसर्गातील विविध प्रजातीसोबत राहणे आपल्यासाठी योग्य आहे. मनुष्य जात स्वार्थी आहे. निसर्ग आणि संसाधनांचा आपण नेहमी दुरुपयोग करतो हे आपण नेहमी विसरुन जातो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

- Advertisement -

भूमीच्या या वक्तव्यामुळे सर्वांनाच विचार करायला भाग पाडले आहे. भूमी पेडणेकर याआधीही निसर्गाविषयी चिंता व्यक्त करताना दिसली आहे. याआधीही निसर्ग वाचवण्यासाठी भूमीने अनेक सल्ले आणि चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. भूमी पेडणेकर एका NGO सोबत देखील काम करते जी निसर्ग संवर्धनाचे काम करते. निधीने तिचा यंदाचा वाढदिवस देखील याच NGO सोबत साजरा केला होता.


हेही वाचा – World Nature Conservation Day: जागतिक निसर्ग संवर्धन दिन का साजरा केला जातो? काय त्यामागचा इतिहास जाणून घ्या

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -