बिग बी झळकणार ‘या’ मराठी चित्रपटात!

बिग बी झळकणार ‘या’ मराठी चित्रपटात!

नागराज मंजुळेसोबत काम करणार बिग बी

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्वीटरवरुन एक आनंदाची बातमी दिली आहे. या वृत्तानुसार लवकरच बिग बी नागराज मंजुळेच्या ‘झुंड’ या आगामी चित्रपटात झळकणार आहेत. नागराज मंजुळेच्या येऊ घातलेल्या ‘नाळ’ चित्रपटच्या ट्रेलरचं कौतुक करणारं एक ट्वीट बिग बींनी केलं आहे. याच ट्वीटद्वारे त्यांनी आपण नागराजसोबत त्याच्या झुंड या आमगी सिनेमात करणार असल्याचं सांगितलं आहे. नाळ चित्रपटानंतर लगेचच नागराज ‘झुंड’वर काम सुरु करणार असल्याचं समजतंय. दरम्यान झुंड चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरु झाल्याची सध्या चर्चा आहे. ‘झुंड’च्या निमित्ताने हिंदी सिनेसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन मराठी चित्रपटात अभिनय करताना पाहायला मिळतील. सध्या सगळीकडे चर्चा आहे ती नागराज मंजुळेच्या ‘नाळ’ या चित्रपटाची. ‘नाळ’च्या ट्रेलरला आणि त्यातील गाण्याला इंटरनेटवर तूफान पसंती मिळते आहे. मराठी प्रेक्षकांनी तर चित्रपटाच्या गाण्याला अक्षरश: डोक्यावर उचलून धरलं आहे. सर्वांचच लक्ष चित्रपटाच्या रिलीजकडे लागून राहिलं आहे. आता अशातच बिग बींनी दिलेल्या या बातमीमुळे मराठी प्रेक्षक सुखावला असणार हे नक्की.


बिग बी मराठी चित्रपटात…

एका खासगी माध्यमाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, झुडं चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन एका निवृत्त क्रीडा शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या वृत्तानुसार पुढील वर्षापर्यंत या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. नागराज मंजुळे आचे निर्माते असतील तर भूषण कुमार या चित्रपटाचं दिग्दर्शन करतील. याविषयी एका मुलाखतीमध्ये बोलताना नागराज मंजुळे म्हणाले, ‘लहानपणापसून ज्यांचे चित्रपट पाहत आलो ते माझ्या चित्रपटात काम करणार हे माझं भाग्य आहे. मला माझं स्वप्न सत्यात उतरल्याचा भास होतो आहे. मी या चित्रपटासाठी खूप उत्सुक होतो. मात्र, आता बिग बी यांनी स्वत: झुंड चित्रपटाची घोषणा केल्यामुळे प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली असणार याची मला खात्री आहे.’
नागराज मंजुळे निर्मित ‘झुंड’ हा अमिताभ बच्चन यांंचा पहिला चित्रपट असणार आहे. अमिताभ बच्चन ज्यांच्यावर जगभरातील लोक प्रेम करतात, त्यांच्या अभिनयाचं कौतुक करतात ते मराठी चित्रपटात काम करणं हे भाग्यच म्हणावं लागेल. मात्र, आता ‘झुंड’ चित्रपटाची कथा नेमकी काय असणार, अमिताभ यांच्यासह चित्रपटात आणखी कोणते कलाकार दिसणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना वाट पहावी लागेल.

वाचा: नापास झाल्यावर नागराज मंजुळेनं काय केलं?

First Published on: November 12, 2018 6:50 PM
Exit mobile version