घरमुंबईनापास झाल्यावर नागराज मंजुळेनं काय केलं?

नापास झाल्यावर नागराज मंजुळेनं काय केलं?

Subscribe

पास नापास, परीक्षा, निकाल म्हटलं की कायमच भिती वाटत असते. हे सगळं आज सांगायचं कारण म्हणजे आज जाहीर होणारा दहावीचा निकाल. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी हा निकाल लवकर जाहीर झाला आहे. निकालाची तारीख जाहीर झाल्यापासूनच भिती, दडपण, उत्सुकता निकाल पाहत नाही तोपर्यत विद्यार्थ्यांच्या मनात धाकधुक सुरू असते. पण त्याच वेळी अपयशामुळे मानसिक तणाव निर्माण होण्याचीही शक्यता असते. मात्र अशा वेळी ‘सैराट’ चित्रपटाचा निर्माता नागराज मंजुळेने विद्यार्थ्यांना खचून न जाण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी त्याने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा आधार घेतला आहे.

नागराज दहावीत झाला दोनदा नापास

सैराट चित्रपटाचा निर्माता नागराज मंजुळेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटला एक फोटो पोस्ट केला आहे. यात नागराजने तो दहावीला असताना दोन वेळा नापास झाला होता, असं लिहिलं आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये नागराजने ‘मी दहावीत दोनदा नापास झालो होतो. पहिल्या प्रयत्नात पास झालो असतो तर पुढच्या वर्गात गेलो असतो फार तर…मात्र नापास झालो म्हणून फार काही बिघडलं होतं असं मला वाटत नाही. दहावी, बारावी, एमपीएससी, युपीएससी परीक्षा कुठलीही असो,
ती अंतिम कधीच नसते. यशापयशात, असल्या-नसल्यात आनंदानं जगत राहण्यापेक्षा दुसरं कुठलंही मोठं यश नाही’, असं म्हटलं आहे. बरोबर दहावीच्या निकालाचा फोटो देखील नागराजने पोस्ट केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो निकाल पास असो किंवा नापास, निराश होऊ नका.

मी दहावीत दोनदा नापास झालो होतो. पहिल्या प्रयत्नात पास झालो असतो तर पुढच्या वर्गात गेलो असतो फार तर… मात्र नापास झालो म्हणून फार काही बिघडलं होतं असं मला वाटत नाही. दहावी, बारावी, एम. पी. एस. सी. , यु. पी. एस. सी.… परीक्षा कुठलीही असो ती अंतिम कधीच नसते. यशापयशात… असल्या-नसल्यात आनंदानं जगत राहण्यापेक्षा दुसरं कुठलंही मोठं यश नाही…

A post shared by Nagraj Popatrao Manjule (@nagraj_manjule) on

- Advertisement -

 

- Advertisement -

निकालाची भिती मनातून काढून टाका

निकाल कोणताही असो, भिती ही कायमच वाटत असते. नापास झालो तर काय होणार? लोक काय म्हणतील? आपल्या ताई, दादाला, मित्र-मैत्रिणींना चांगले मार्क मिळाले आहेत. मला कमी मार्क मिळाले तर काय होणार? जर मी नापास झालो तर काय होणार? पण मनातून निकालाची भिती काढून टाका.

लोकांच्या प्रश्नांना घाबरून जाऊ नका

‘काय मग किती…?’ पास की नापास? या प्रश्नाला जर आपण नापास झालो हे लोकांना सांगणार कसं? या भितीनेच काही विद्यार्थी खचून जातात. खरं तर असं निराश होण्यात, खचून जाण्यात काही अर्थ नाही. आज अनेक मोठ्या व्यक्ती ही त्यांच्या आयुष्यात त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात मोठ्या पदावर आहेत. त्यामुळे आज दहावीच्या निकालात नापास जरी झालात तरी खचून जाऊ नका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -