Bigg Boss 14: ‘हे’ तीन नवे सदस्य बिग बॉस घरात प्रवेश करणार

Bigg Boss 14: ‘हे’ तीन नवे सदस्य बिग बॉस घरात प्रवेश करणार

Bigg Boss 14: 'हे' तीन नवे सदस्य बिग बॉस घरात प्रवेश करणार

‘बिग बॉस १४’च्या घरात नेहमी काहीतरी नवे पाहायला मिळत आहे. पहिल्यांदा तुफानी सिनियर्सने खूप धमाल केली आणि आता ते बाहेर गेले आहेत. याशिवाय शहजाद देओल आणि सारा गुरपाल हे दोघे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले आहे. आता बिग बॉस घरात तीन नवे सदस्य प्रवेश करणार आहे. कविता कौशिक, शार्दुल आणि नैना सिंह हे तीन सदस्य बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एंट्री करणार आहेत. जाणून घ्या या तीन नव्या सदस्यांबद्दल….

कविता कौशिक – कविता कौशिक टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला लोकं पहिल्यापासून ओळखतात. कविता सर्वात जास्त लोकप्रियता सब टिव्हीवरील शो एफआयआर मधून मिळाली होती. यामध्ये तिने इंस्पेक्टर चंद्रमुखी चौटालाची भूमिका केली होती. दरम्यान तिने आपल्या करिअरची सुरुवात २००३ मध्ये कुमकुम भाग्य मालिकेतून केली होती. आता ती बिग बॉसच्या घरात कशी खेळते ते पाहायला मिळेल?

नैना सिंह – झी टिव्हीवरील लोकप्रिय मालिका कुमकुम भाग्यशी नैना सिंहचा देखील संबंध आहे. तिने या मालिकेमध्ये रिया मेहराची भूमिका साकारली होती. यामुळे तिला बरीच लोकप्रियता मिळाली होती. नैनाने देखील करिअरची सुरुवात टेलिव्हिजन मालिकेतून सुरुवात केली. ती फेमिना मोस्ट स्टायलिस्ट डिवा जिंकली आहे. शिवाय ती एमटीव्हीवरील स्प्लिट्सविला १० जिंकली आहे. आता बिग बॉस जिंकण्यासाठी काय काय करते हे पाहता येईल?

शार्दुल पंडित – शार्दुल पंडित पण एक टेलिव्हिजन अभिनेता आहे. तो पहिल्यांदा ‘इंडिया बेस्ट सीने स्टार की खोज’ या मालिकेतून समोर आला होता. रेडिओ जॉकी असलेल्या शार्दुलला एडटीव्हीवरील ‘बंदिनी’ ही पाहिली मालिका मिळाली होती. त्यानंतर तो ‘कितनी मोहब्बत’ या मालिकेत दिसला होता. याशिवाय शार्दुला बॉक्स क्रिकेट लीगमध्ये कॉमेंट्री करत असतो. बिग बॉस घरात जाताच शार्दुलचे नैना सोबत भांडण होताना दिसले.

First Published on: October 25, 2020 4:42 PM
Exit mobile version