बिपाशा बसूने दाखवली मुलीची पहिली झलक; कमेंट करत चाहत्यांकडून कौतुक

बिपाशा बसूने दाखवली मुलीची पहिली झलक; कमेंट करत चाहत्यांकडून कौतुक

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू नुकत्याच काही दिवसांपूर्वी आई झाली. बिपाशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. दरम्यान, नुकतीच बिपाशाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट देखील शेअर केली आहे. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बिपाशाने शेअर केलेली ही पोस्ट पाहून तिचे चाहते खूप खूश झाले आहेत.

बिपाशा बसूने शेअर केली मुलीची पहिली झलक

2016 साली झालं बिपाशा-करणचं लग्न
बिपाशाने 2001 मध्ये तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘अजनबी’ या सिनेमातून केली होती. या चित्रपटात तिने अक्षय कुमारसोबत काम केले होते. याशिवाय बिपाशा बसूने ‘राज’, ‘रक्त’, ‘फूटपाथ’, ‘ऐतबार’सह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. बिपाशा बसू बऱ्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तिने शेवटचे 2015 मध्ये ‘अलोन’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत करण सिंग ग्रोव्हर दिसला होता. तिथून दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली आणि त्यानंतर 2016 मध्ये दोघांनी लग्न केले. बिपाशासोबतचे हे त्याचे तिसरे लग्न आहे.

 


हेही वाचा :

अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ने केला 100 कोटींचा टप्पा पार

First Published on: November 26, 2022 11:19 AM
Exit mobile version