राहुल रॉय ICU मधून बाहेर, घेतायत स्पीच थेरपी

राहुल रॉय ICU मधून बाहेर, घेतायत स्पीच थेरपी

राहुल रॉय ICU मधून बाहेर, घेतायत स्पीच थेरपी

‘आशिकी’ फेम अभिनेते राहुल रॉय यांना काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यांना मुंबईतल्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे समोर आले आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी त्यांचा प्रकृतीत सुधार चांगला झाला आहे. आता त्यांना आयसीयू (ICU)मधून जनरल रुममध्ये हलविण्यात आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी राहुल रॉय यांच्या स्पीच आणि फिजिकल थेरेपी सुरुवात केली आहे.

माहितीनुसार, राहुल रॉय यांची मेहुणी रोमीर यांनी सांगितलं की, ‘आता ते धोक्यातून बाहेर आले आहेत आणि त्यांना काल आयसीयूतून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.’

गेल्या काही दिवसांपासून राहुल रॉय चित्रपट LAC- Live the Battle चे कारगिलमध्ये शूटिंग करत होते. शूटिंग दरम्यान त्यांची प्रकृती बिघडली. ज्यानंतर त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राहुल रॉय यांच्यासोबत काम करणारा अभिनेता निशांत मलकानी म्हणाला की, ‘हे सर्व गेल्या मंगळवारी घडले. ते सोमवारी रात्री झोपताना ठिक होते. त्यांना वातावरणामुळे हा त्रास झाला असेल, असे मला वाटते. जिथे आम्ही शूटिंग करत होतो, तिथले तापमान -१५ डिग्री सेंटीग्रेड होते.’

LAC- Live the Battle या चित्रपटात निशांत मलकानी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कुमार गुप्ता यांनी केले असून चित्रा वकिल शर्मा आणि निवेदिता बासु यांनी निर्मिती केली आहे.


हेही वाचा – मलायका-अर्जुनची ‘जादू की झप्पी’ व्हायरल!


 

First Published on: December 2, 2020 2:55 PM
Exit mobile version