घरताज्या घडामोडीमलायका-अर्जुनची 'जादू की झप्पी' व्हायरल!

मलायका-अर्जुनची ‘जादू की झप्पी’ व्हायरल!

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर सध्या लव्ह लाईफमुळे खूपच चर्चेत आहेत. आता पुन्हा एकदा मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे त्यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. मलायका आणि अर्जुनचा हा फोटो खूपच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मलायका आणि अर्जुन एकमेकांच्या मिठ्ठी मग्न होऊन क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे.

मलायका अरोराने जो फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, त्यामध्ये ती आपल्या बॉयफ्रेंड अर्जुनसोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहे. हा फोटो शेअर करत मलायकाने लिहिले आहे की, ‘जेव्हा तू जवळपास असतोस तेव्हा कधीही कंटाळवाणे वाटत नाही.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

- Advertisement -

मलायकाने शेअर केलेल्या या फोटोवर अर्जुनने लगेच कमेंट केली आहे. तो तिने लिहिलेल्या कमेंटशी सहमत असल्याचे  सांगितले आहे. याआधी २ दिवसांपूर्वी तिने ‘थँक्स गिविंग’चा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओमधील पहिला फोटो मलायका आणि अर्जुनचा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

अलीकडेच मलायका आणि अर्जुन व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथे पोहोचले होते. अर्जुन कपूर येथे आगामी चित्रपट ‘भूत पुलिस’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेला होता. या चित्रपटात अर्जुनसोबत सैफ अली खान देखील आहे. त्यामुळेच करिना कपूर आणि मलायका अरोरा दोघीजणी व्हेकेशन एन्जॉय करताना दिसल्या होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -