वरुण-नताशा झाले मेड फॉर इच अदर

वरुण-नताशा झाले मेड फॉर इच अदर

वरुण-नताशा झाले मेड फॉर इच अदर

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा रंगली होती. मात्र तो दिवस आज अखेर उजाडला आणि दोघेही आज विवाह बंधनात अडकले. अलिबागच्या समुद्र किनारी यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या विवाह सोहळ्याला वरुणचे बॉलिवूडमधील मित्र करण जोहर, मनीष मल्होत्रा, अर्जुन कपूर-मलाइका अरोरा यांच्यासह अनेक बॉलिवूड स्टार्सने हजेरी लावली आहे.

लग्नात विघ्न

वरुण धवन लग्नाला जात असताना त्याच्या गाडीचा अपघात झाला. लग्नाच्या तयारीसाठी वरुण जुहूवरुन अलिबागच्या दिशेने रवाना झाला होता. मात्र, त्याचवेळी वाटेत त्याचा अपघात झाला. सुदैवाने वरुणला कोणतही कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र, त्याच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

अलिबागमधील ‘द मॅन्शन हाऊस’ येथे वरुण आणि नताशा यांनी लग्नगाठ बांधली. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. तसेच सुरक्षेची अत्यंत कडेकोट व्यवस्थाही करण्यात आली होती. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यात मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली.

जाणून घ्या नताशाबाबात

वरुण धवनसोबत विवाह बंधनात अडकलेली नताशा दलाल एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिने आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलेब्रिटींसाठी ड्रेस डिझाईन केले आहेत. विशेष बाब म्हणजे वरुण आणि नताशा सहावीपासून एकमेकांचे मित्र आहेत. त्यांची ही मैत्री बारावीपर्यंत टिकली. नंतर त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. नताशाचे वडील उद्योगपती असून आई गृहिणी आहे. तर नताशाचा आवडता अभिनेताही वरुण धवन आहे.


हेही वाचा – मालदीवच्या बीचवर बिकनीमध्ये एन्जॉय करताना दिसली सारा; नेटिझन्स फिदा


 

First Published on: January 24, 2021 3:33 PM
Exit mobile version