वरुण धवन २४ जानेवारीला बोहल्यावर चढणार!

वरुण धवन २४ जानेवारीला बोहल्यावर चढणार!

वरुण धवन २४ जानेवारीला बोहल्यावर चढणार!

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल (Natasha Dalal) यांच्या लग्नाबद्दल सध्या जास्तच चर्चा सुरू आहे. आता त्यांच्या लग्नाबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे. लवकरच वरुण धवन मैत्रिण आणि फॅशन डिझायनर नताशा दलालसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. याबाबतची माहिती धवन कुटुंबियांच्या जवळच्या सुत्राने दिली आहे. माहितीनुसार वरुण धवन आणि नताशा दलाल एकाच शाळेत शिकत होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. पण आता दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा – ड्रेस फाटलेला असताना जॅकलिनने काढला सेल्फी अन्


 

First Published on: January 19, 2021 3:20 PM
Exit mobile version