दोन वेळा झाला होता ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचा गर्भपात

दोन वेळा झाला होता ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचा गर्भपात

दोन वेळा झाला होता 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचा गर्भपात

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोलची जोडी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. लवकरच दोघेही ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहे. पण अलीकडेच काजोलने अजय देवगणसोबतच्या लग्नाबद्दल एक खुलासा केला आहे. या दोघांच्या लग्नाआधी काजोलचे वडिलांनी तिच्यासोबत चार दिवस बोलले नव्हते. याशिवाय काजोलने तिच्या आणि अजय देवगणच्या नात्यासंबंधी देखील खास गोष्टी शेअर केल्या आहेत. यावेळी तिने गर्भपाताविषयी देखील सांगितलं आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काजोलने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक क्षणांबद्दल लिहिलं आहे.

काय म्हणाली काजोल?

काजोलने इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्ये असं लिहिलं आहे की, ‘आम्ही २५ वर्षांपूर्वी ‘हलचल’ या चित्रपटाच्या सेटवर भेटलो होतो. मी माझ्या शूटसाठी तयार झाले होते आणि तेव्हा मी विचारले की, माझा हिरो कुठे आहे. त्यावेळेस कोणी तरी त्यांच्याकडे इशारा केला. तो एका कोपऱ्यात बसला होता. त्याला १० मिनिट भेटण्यापूर्वी मी त्याच्या विषयी थोडीशी बातचित केली होती. आम्ही सेटवर बोलण्यास सुरुवात केली आणि आम्ही दोघे मित्र झालो. त्यावेळेस मी दुसऱ्या व्यक्तीला डेट करत होते. मी अजयला माझ्या त्या बॉयफ्रेंडबद्दलच्या सारखी तक्रार करत होते. मग त्याच्यासोबत माझा ब्रेकअप झाला.’ काजोलने तिच्या आणि अजय देवगणच्या विषयी बोलताना म्हणाली, ‘माझे मित्र मला अजयबद्दल खूप सांगतं होते. परंतु तो माझ्यासोबत खूप वेगळा वागत होता.’

काजोल आणि अजयने घरी केलं लग्न 

पुढे ती म्हणाली, ‘आम्ही एकमेकांना ४ वर्षे डेट करत होतो. त्यानंतर आम्ही लग्नाबद्दल विचार केला. त्यावेळेस त्याचे आई-वडिल बोर्डरवर होते. मात्र माझे वडिल माझ्यासोबत चार दिवस बोलत नव्हते. त्यांच मत होते की, मी माझ्या करियरवर लक्ष द्यावं. त्यानंतर कोणतही प्रपोजल आलं नाही आणि आम्हाला माहित होत की, आपण आपलं आयुष्य एकत्र घालवायचं आहे. आम्ही घरीच लग्न केलं आणि मीडियाला चुकीचा पत्ता दिला. कारण हा दिवस फक्त आमचा होता.’

काजोलचा दोन वेळा झाला होता गर्भपात 

काजोलने लिहिलं, ‘मी ‘के३जी’ (कभी खुशी कभी गम) च्यादरम्यान गरोदर राहिले. परंतु त्यावेळेस देखील पुन्हा गर्भपात झाला होता. मी त्यादिवशी हॉस्पिटलमध्ये होते. चित्रपटाने चांगली कामगिरी केली होती. मात्र तो दिवशी आनंदाचा नव्हता. त्यानंतर माझ्या पुन्हा एकदा गर्भपात झाला. हे खूप कठीण दिवस होती. परंतु शेवटी काम झालं आणि आमच्याकडे न्यासा आणि युग आले, ज्यामुळे आमचं कुटुंब पूर्ण झालं.’


हेही वाचा – छपाकची संकटं संपता संपेनात; एक संपलं, दुसरं सुरू झालं!


 

First Published on: January 9, 2020 3:44 PM
Exit mobile version