सुकेश चंद्रशेखर प्रकरणी अभिनेत्री नोरा फतेहीची सात तास चौकशी

सुकेश चंद्रशेखर प्रकरणी अभिनेत्री नोरा फतेहीची सात तास चौकशी

दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW- economic offences wing) शुक्रवारी बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीची आरोपी सुकेश चंद्रशेखर प्रकरणी चौकशी केली, बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीची जवळपास 7 तास चौकशी सुरु होती आणि (EOW) चे सह पोलीस आयुक्त छात्रा शर्मा यांच्या कार्यालयात नोरा फतेहीला 50 हून अधिक प्रश्न विचारण्यात आले. दरम्यन या संदर्भांत बॉलिवूडच्या इतरही अभिनेत्रींना चोकशीला सामोरं जावं लागलं आहे. ज्यात जॅकलिन फर्नांडिस हिचं सुद्धा नाव नाव आहे. जॅकलिनला 12 सप्टेंबर रोजी (EOW) कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे.

हे ही वाचा –  किशोर कुमार यांच्या बंगल्यात विराट कोहली सुरू करतोय नवं रेस्टॉरंट

200 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या आरोपी सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री नोरा फतेही, जॅकलीन फर्नांडिस आणि लीना मारिया पाल यांच्यावर करोडो रुपये खर्च केल्याचं बोललं जात आहे. सुकेशने या तिघींना कोट्यवधी रुपयांच्या मौल्यवान भेटवस्तू दिल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या (EOW-economic offences wing) याप्रकरणी आधी गुन्हा दाखल केला होता. यानंतर, ईडीने मनी लॉन्ड्रिंग केस अंतर्गत एफआयआर दाखल केली आणि जॅकलिन सोबतच नोरा फतेही आणि इतरांचीसुद्धा चौकशी केल्यानंतर आरोपपत्र दाखल केले. या संपूर्ण प्रकरणात दिल्ली पोलिसांनी लीना मारिया पाल आरोपी बनवले आहे.

हे ही वाचा –  ‘हे तर आठवं आश्चर्य’ समंथाच्या नव्या चित्रपटावर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

अशातच दिल्ली पोलीस आता अभिनेत्री नोरा फतेही आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांची चौकशी करून पुरावे गोळा करत आहेत. EOW पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अभिनेत्री नोरा दुपारी 12 वाजताच्या सुमारास EOW च्या कार्यालयात पोहोचली. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत तिची चौकशी करण्यात आली. सह पोलिस आयुक्त छाया शर्मा यांच्या नेतृत्वाखालील सहा पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने अभिनेत्री नोरा फतेहीला 50 हून अधिक प्रश्न विचारले. चौकशी दरम्यान नोरा फतेहीने सुकेश कडून महागडी कार गिफ्ट म्हणून घेतल्याचे सांगितले. त्याव्यतिरिक्त कोणतेच गिफ्ट स्वीकारेल नाही असंही नोरा फतेही म्हणाली.

हे ही वाचा –  अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला समन्स; २६सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे दिले आदेश

First Published on: September 3, 2022 3:05 PM
Exit mobile version