घरमनोरंजनकिशोर कुमार यांच्या बंगल्यात विराट कोहली सुरू करतोय नवं रेस्टॉरंट

किशोर कुमार यांच्या बंगल्यात विराट कोहली सुरू करतोय नवं रेस्टॉरंट

Subscribe

विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांचेही चाहते सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा देत आहेत . त्यांच्या या नवीन रेस्टॉरंटसाठी त्या दोघांचे चाहते उत्सुक आहेत.

प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली(virat kohli) नेहमीच काही न काही कारणांमुळे चर्चेत असतो. यावेळी सुद्धा विराट अशाच एक कारणामुळे चर्चेत आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज गायक आणि अभिनेते किशोर कुमार(kishore kumar) यांच्या “गौरी कुंज” बंगल्याचा एक हिस्सा घेतला आहे. विराट कोहलीने ही जागा त्याच्या पुढच्या रेस्टॉरंटसाठी घेतली आहे. किशोर कुमार यांचा हा मुंबईतील जुहूमध्ये आहे. याच बंगल्यामध्ये विराट कोहली त्याची प्रसिद्ध रेस्टॉरंट चेन ‘One8 Commune’ उघडणार आहे. दरम्यान ही बातमी समोर येताच विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा(anushka sharma) या दोघांचेही चाहते सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा देत आहेत . त्यांच्या या नवीन रेस्टॉरंटसाठी त्या दोघांचे चाहते उत्सुक आहेत.

हे ही वाचा – विराट कोहलीचा पंजाबी लूक; फोटो पाहिलात का?

- Advertisement -

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची(virat kohli) स्वत:चे रेस्टॉरंट आहे. ज्याचे नाव ‘One8 Commune’ आहे. विराटने हे नाव त्याच्या जर्सीच्या क्रमांकावरून ठेवले आहे. त्याच्या जर्सीचा क्रमांक 18 आहे. विराट कोहली सोशल मीडियावरून नेहमीच पोस्ट करत असतो आणि त्याच्या नवीन कामसंदर्भांत किंवा क्रिकेट संदर्भांत त्याच्या चाहत्यांना माहिती देत असतो. विराटने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत त्याच्या नवीन रेस्टॉरंटच्या उद्घाटना संदर्भांत माहिती दिली आहे. विराटने त्याच्या पोस्ट मध्ये लिहिले आहे की, ‘जुहू, मुंबई #ComingSoon’. विराट कोहलीच्या रेस्टॉरंटची साखळी मुंबई(mumbai), पुणे आणि दिल्ली यामध्ये सुद्धा आहे.

हे ही वाचा – विराट कोहली इन्स्टाग्रामवर सर्वाधिक पैसे कमवणाऱ्यांच्या यादीत

- Advertisement -

दरम्यान किशोर कुमार यांच्या मुंबईतली जुहू(juhu) इथल्या बांगलया बद्दल सांगायचे तर ” गौरी कुंज” या बंगल्यात या आधीही “बी मुंबई” नावाचे एक रेस्टॉरंट होते. पण ते आता बंद झाले आहे. “बी मुंबई” या रेस्टॉरंटला काही वर्षांपूर्वी मुंबई महानगर पालिकेने बांधकामांच्या नियमांविरुद्ध नोटीस बजावली होती कारण की त्या रेस्टॉरंटच्या मालकाने गौरी कुंज या बंगल्यामधील काही भाग तोडून त्याची पुनर्बांधणी केली होती. दरम्यान किशोर कुमार यांच्या बंगल्यातील जागा पाच वर्षांसाठी लीज तत्वावर घेतली आहे.

हे ही वाचा – कोणाचे मन दुखावले असेल तर तुमची माफी मागतो… आमीर खानचा व्हिडीओ डिलीट

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -