सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंगच्या आईचे कोरोनामुळे निधन

सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंगच्या आईचे कोरोनामुळे निधन

सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंगच्या आईचे कोरोनामुळे निधन

बॉलिवूड सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंगच्या आईचे निधन झाल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून अरिजीत सिंग याच्या आई कोलकातमधील रुग्णालयात होती. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच काही दिवसांपासून त्या ECMOवर होत्या आणि त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. आज गुरुवारी सकाळी ११ वाजता अरिजीतच्या आईने अखेरच्या श्वास घेतला.

दरम्यान अरिजीत सिंगची आई रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातमीला अभिनेता स्वास्तिकने दुजोरा दिला होता. त्याने सोशल मीडियावर एका पोस्ट केली होती. स्वास्तिकने लिहिले होते की, ‘अरिजीतच्या आईसाठी A रक्तगटाची आवश्यकता आहे. त्या Amri Dhakuria मध्ये भरती आहेत.’ याशिवाय चित्रपट निर्मिता श्रीजित मुखर्जीने पण लोकांना विनंती केली होती. त्याने बंगालीमध्ये ट्वीटर करून अरिजीत सिंगच्या आईसाठी मदत मागितली होती.

अरिजीत सिंगच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर २००५मध्ये त्याने करिअरला सुरुवात केली होती. अरिजीतने सिंगिग रिअॅलिटी शो ‘फेम गुरुकुल’मध्ये भाग घेतला होता. पण अरिजीतला या शोमुळे जास्त लोकप्रियता मिळाली नाही. अरिजीतने त्याच्या प्रवासात खूप मेहनत घेतली आहे. ‘आशिकी २’ चित्रपटातील तुम ही हो या गाण्यामुळे अरिजीतची ओळख झाली. अरिजीत बॉलिवूडमध्ये रोमँटिक गाण्यांसाठी ओळखला जातो. अरिजीतची प्रत्येक गाणी लोकप्रिय झाली आहेत. त्याच्या हिट्स गाण्यांची मोठी लिस्टच आहे. कबीरा, सुनो ना संगमरमर, मस्त मगन, हमदर्द सारखी अनेक गाणी अरिजीतची लोकप्रिय झाली आहेत.


हेही वाचा – मनिषासोबतचा ब्रेकअप आयुष्यातील सर्वात कठीण काळ, नाना पाटेकरांना आठवणीने अश्रू अनावर


 

First Published on: May 20, 2021 4:50 PM
Exit mobile version