बॉलिवूड विरुद्ध साऊथ चित्रपट…बाप हा बापच असतो…सुनील शेट्टीचा टोला

बॉलिवूड विरुद्ध साऊथ चित्रपट…बाप हा बापच असतो…सुनील शेट्टीचा टोला

गेल्या अनेक दिवसांपासून हॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये चांगलाच वाद विवाद सुरू झालेला आहे. या दोन्ही इंडस्ट्रीतील कलाकार आपापसात भांडत आहे. एकीकडे सध्या टॉलिवूडच्या चित्रपटांचा चांगलाच बोलबाल सुरू आहे. तर दुसरीकडे बॉलिवूड सुद्धा एकापेक्षा एक चित्रपटांची झलक दाखवत आहे. मात्र यामध्ये टॉलिवूडच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कल्ला करत आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी टॉलिवूड अभिनेता महेश बाबू ने बॉलिवूडमध्ये काम करण्याबाबतच्या प्रश्नावर एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
आता हाच मुद्दा पकडून अभिनेता सुनील शेट्टीने या वादात उडी मारली आहे.

सुनील शेट्टी दिली प्रतिक्रिया
सुनील एका मुलाखतीत म्हणाला, “मला वाटतं की बॉलिवूड विरुद्ध टॉलिवूड इंडस्ट्रीचा सीन सोशल मीडियावर मुद्दाम तयार केले जात आहे. आपण भारतीय आहोत आणि जर ओटीटी प्लाटफॉर्मला पहायला गेलं तर, तिथे भाषेचा काही संबंध नसतो, कारण तिथे कंटेंट कसा आहे हे मॅटर करतं. याप्रकारे बॉलिवूड विरुद्ध टॉलिवूड इंडस्ट्रीचा फरक हाच आहे. मी पण साउथ मधुनच येतो. परंतु माझी कर्मभूमि मुंबई आहे त्यामुळे मी स्वताःला मुंबईकर समजतो.”

सुनील शेट्टी पुढे म्हणाला की, खरी गोष्ट अशी आहे की, प्रेक्षक बघून घेतील त्यांना कोणता चित्रपट पाहायचा आहे आणि कोणता नाही पहायचा. माझी समस्या एकचं आहे की, आम्ही कुठे न कुठे प्रेक्षकांना विसरत आहोत. चित्रपटात मला नेहमी लोक म्हणतात की, चित्रपट असो किंवा ओटीटी, बाप हा बापच असतो. बाकी सगळे फॅमीली मेंबर असतात.

सुनील शेट्टी शेवटी म्हणाला की, भारतामध्ये ७० टक्के प्रेक्षक असे असतात जे चित्रपटगृहात चित्रपटाचा कटेंट पाहून शिट्टी वाजवतात. हीरोचा शॉट, बॅक शॉट असतो. मला वाटत की आपल्याला कंटेंटवर काम करायला हवं. बॉलिवूड नेहमी बॉलिवूडच राहील आणि आपण भारताला ओळखू तर बॉलिवूड कलाकारांना पण ओळखणारचं.

 


हेही वाचा :महेश बाबूचा यू टर्न, बॉलिवूडबद्दल जे बोललो तो फक्त एक विनोद होता

First Published on: May 12, 2022 10:34 AM
Exit mobile version