घरमनोरंजनमहेश बाबूचा यू टर्न, बॉलिवूडबद्दल जे बोललो तो फक्त एक विनोद होता

महेश बाबूचा यू टर्न, बॉलिवूडबद्दल जे बोललो तो फक्त एक विनोद होता

Subscribe

दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू स्वतःच्याच विधानावर ठाम नाही. सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्यावर 'मी विनोद करत होतो' असं म्हणाला

महेश बाबू हा सतत काही न काही कारणामुळे सतत चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड आणि दाक्षिणात्य कलाकारांमध्ये कोल्ड वॉर सुरु असतानाच अभिनेता महेश बाबू याने एका मुलाखती दरम्यान एक विधान केलंय. “हिंदी सिनेसृष्टीला मी परवडणार नाही. त्यामुळे हिंदी चित्रपट करुन मला माझा वेळ फुकट घालवायचा नाही”, असे महेश बाबू म्हणाला. पण आता महेश बाबूने यु टर्न घेतला आहे. मी बॉलिवूडबद्दल जे बोललो तो फक्त एक विनोद होता, असे त्याने म्हटले आहे.

अभिनेता महेश बाबूचे जगभरात लाखो चाहते आहेत. महेश बाबूचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतो. गेल्या काही महिन्यांपासून महेश बाबू बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र त्यावर आत्ता महेश बाबू व्यक्त झालाय. सध्या महेश बाबू ‘सरकारु वारी पाटा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. येत्या १२ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यावेळी माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत त्याने हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल भाष्य केले आहे. यावेळी त्याला ओटीटीसह बॉलिवूडमध्ये सुद्धा पदार्पण करणार का असं विचारलं असता महेश बाबू म्हणाला , “मी मोठ्या पडद्यावरच चांगला दिसतो. सध्या मी ओटीटी वर काम कारण्याबाबद काहीच विचार केलेला नाही. पण बॉलिवूडला मात्र मी परवडणार नाही.”

- Advertisement -

“मला बॉलिवूडमधून फार जास्त ऑफर मिळालेल्या नाहीत. पण मला वाटत नाही की मी बॉलिवूडला परवडेन आणि मला अशा सिनेसृष्टीत काम करायचे नाही ज्यांना मी परवडत नाही. जो स्टारडम आणि आदर मला दाक्षिणात्य सिनेसृष्टीत मिळतो तो फार मोठा आहे. त्यामुळे मी माझी सिनेसृष्टी सोडण्याबद्दल कधीच विचार शकत नाही. मी नेहमीच चांगले चित्रपट करण्याचा प्रयत्न करतो आणि ते हिट होण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला आहे. माझी स्वप्ने आता पूर्ण होत आहेत. मला आता जास्त आनंदी व्यक्ती बनायचे नाही”, असे महेशबाबू म्हणाला. काही आठवड्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत महेश बाबू यांना हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा तो म्हणाला, “मला हिंदी चित्रपटात काम करण्याची गरज नाही. कारण आता तेलुगू चित्रपट देशभरात पाहायला मिळतात. त्यामुळे मला कोणत्याही खास हिंदी चित्रपटात काम करण्याची गरज नाही.”

महेश बाबू याने केलेल्या विधानामुळे तो सध्या चांगलाच चर्चेत आलाय. आणि आत्ता स्वतःच बोलणं पाठीशी घालत महेश बाबू असं म्हणतोय कि, मी सिनेमावर प्रेम करतो आणि त्याच बरोबर सगळ्या भाषांचा सन्मान सुद्धा करतो. आणि मी बॉलिवूड बद्दल जे काही बोललो तो फक्त एक विनोद होता आणि त्याला विनोदी अंगानेच घेण्यात यावा.  त्यात कोणताही चुकीचा अर्थ शोधू नये. पुढे महेश बाबू असंही म्हणाला कि मी सध्या माझी सगळी स्वप्न पूर्ण होताना पाहतोय. आणि तेलुगू चित्रपट सृष्टी सुद्धा आत्ता जलद गतीने पुढे जातेय. तेलुगू चित्रपटालाही आत्ता मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक वर्ग मिळतोय. महेश बाबू ने मुलाखती दरम्यान जे वक्तव्य केलं आणि आत्ता त्या नंतर त्याच हे असं बोलणं कुठेतरी दुटप्पी पणाच वाटत आहे. दरम्यान महेश बाबू च्या आगामी चित्रपटाला प्रेक्षक काय प्रतिसाद देतायत हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल आणि त्याच बरॊबर बॉलिवूड मधील कलाकार महेश बाबू च्या या विधानावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -