‘ब्रह्मास्त्र’चा बॉक्स ऑफिसवर जोरदार कल्ला; जगभरातून केला 300 कोटींचा टप्पा पार

‘ब्रह्मास्त्र’चा बॉक्स ऑफिसवर जोरदार कल्ला; जगभरातून केला 300 कोटींचा टप्पा पार

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा बहुचर्चित चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ‘ब्रह्मास्त्र’ने आत्तापर्यंत कोट्यावधींची कमाई केली असून दिवसेंदिवस ही रक्कम अधिकाधिक वाढत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटावर अनेकजण बहिष्कार टाकण्याची मागणी करत होते. मात्र तरीही यावर कोणताच परिणाम झाला नाही. ‘ब्रह्मास्त्र’ने प्रदर्शनापूर्वीच अॅडव्हान्स बुकींगद्वारे 36 कोटींची कमाई केली होती.

‘ब्रह्मास्त्र’ 2022 मधील सर्वात भव्य चित्रपट
9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ने आत्तापर्यंत 183 कोटींचा आकडा पार केला आहे. तसेच संपूर्ण जगभरातून या चित्रपटाने 200 कोटींचा आकडा पार केला आहे. तसेच गुरूवारी चित्रपटाने 9 कोटींची कमाई केली होती. तर शुक्रवारी ‘ब्रह्मास्त्र’ने 10.30 कोटींची कमाई केली आहे.

जगभरातून 200 कोटींचा टप्पा पार

का खास आहे ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट?
ब्रह्मास्त्र चित्रपटाला 2022 मधील सर्वात मोठा चित्रपट मानला जात आहे. रणबीर आणि आलियासाठी हा चित्रपट खूप खास आहे, कारण या चित्रपटात दोघेही पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यामुळे त्या दोघांचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत.

‘दंगल’ आणि ‘पद्मावत’ला देखील टाकलं मागे
‘ब्रह्मास्त्र’ने बॉलिवूडमधील मोठमोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. बॉलिवूडमधील बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा संजू, टायगर जिंदा है , पद्मावत, धूम 3 , दंगल आणि चेन्नई एक्सप्रेस यांसारख्या चित्रपटांना मागे टाकलं आहे.


हेही वाचा :

‘ब्रह्मास्त्र’ला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद; पहिल्या दिवशी कमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

First Published on: September 18, 2022 12:31 PM
Exit mobile version