घरमनोरंजन'ब्रह्मास्त्र'ला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद; पहिल्या दिवशी कमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला

‘ब्रह्मास्त्र’ला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद; पहिल्या दिवशी कमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

Subscribe

बॉक्स ऑफिसच्या कमाईच्या आकड्यांवरून हे लक्षात येतय की, 'ब्रह्मास्त्र' बॉलिवूडमधील कोरोनानंतरचा सर्वात मोठा चित्रपट आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. 9 सप्टेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगद्वारे 19.66 कोटींची कमाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रह्मास्त्रने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी संपूर्ण देशभरात 36 कोटींची कमाई केली आहे. ब्रह्मास्त्रने हिंदी भाषेत 32 कोटींची कमाई कमावलेले आहेत. तसेच संपूर्ण जगभरातून या चित्रपटाने जवळपास 50 कोटींची कमाई केली आहे.

- Advertisement -

कोरोनानंतर बॉलिवूडचा सर्वात मोठा चित्रपट
बॉक्स ऑफिसच्या कमाईच्या आकड्यांवरून हे लक्षात येतय की, ‘ब्रह्मास्त्र’ बॉलिवूडमधील कोरोनानंतरचा सर्वात मोठा चित्रपट आहे. याआधी अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ , आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया 2’ चांगला प्रतिसाद मिळाला होता.

का खास आहे ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट?
ब्रह्मास्त्र चित्रपटाला 2022 मधील सर्वात मोठा चित्रपट मानला जात आहे. रणबीर आणि आलियासाठी हा चित्रपट खूप खास आहे, कारण या चित्रपटात दोघेही पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यामुळे त्या दोघांचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत.

- Advertisement -

75 रूपयांमध्ये पाहू शकणार चित्रपट
राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त 16 सप्टेंबर रोजी तिकिटाची किंमत फक्त 75 रूपये असणार आहे. त्यामुळे तुम्ही 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला ‘ब्रह्मास्त्र’ तुम्ही 16 सप्टेंबर रोजी 75 रूपयांमध्ये पाहू शकता.अयान मुखर्जी यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचे शुटींग आता पूर्ण झाले असून, आलिया आणि रणबीर, अमिताभ आणि मौनी रॉय या चित्रपटात मुख्य भुमिकेत दिसून येतील. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला आहे.


हेही वाचा :

‘ब्रह्मास्त्र’वर होणार नाही बहिष्काराचा परिणाम; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये एक लाखापेक्षा जास्त तिकिटांची विक्री

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -