‘छपाक’पूर्वी ‘या’ चित्रपटातून उलगडली होती अॅसिडग्रस्त तरुणीची कथा

‘छपाक’पूर्वी ‘या’ चित्रपटातून उलगडली होती अॅसिडग्रस्त तरुणीची कथा

'छपाक'पूर्वी 'या' चित्रपटातून उलगडली होती अॅसिडग्रस्त तरुणीची कथा

नुकताचं अॅसिड अटॅक सारख्या संवेदनशील विषयावर आधारित ‘छपाक’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. सध्या सत्य घटनेवर आधारलेल्या याच चित्रपटामुळे बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण चर्चेत आली आहे. अॅसिड अटॅकमधून बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल हिच्या आयुष्यावर आधारित ‘छपाक’ चित्रपटाचे कथानक आहे. ‘छपाक’ चित्रपटापूर्वी अॅसिड अटॅक झालेल्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित एका चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. ‘उयारे’ असं या दाक्षिणात्य चित्रपटाचं नावं आहे. दीपिकासारखी अन्य एका अभिनेत्रीने याच धाटणीची भूमिका साकारली होती. मात्र ही अभिनेत्री लोकप्रिय झाली नाही.

‘उयारे’ चित्रपटात अॅसिड अटॅकमध्ये बळी पडलेल्या तरुणी पुन्हा जीवनात संघर्ष करून कशी उभी राहते हे दाखविण्यात आलं आहे. या दाक्षिणात्य चित्रपटात अभिनेत्री पार्वती थिरुवोथु हिने प्रमुख भूमिका साकारली आहे. कला क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी पावर्ती छोट्या पडद्यावर रिअॅलिटी शोमध्ये सूचसंचालन करायची. या चित्रपटामधील तरुणी खूप शिकून वैमानिक होण्याचं स्वप्न ती पाहतं असते. मात्र एक क्षण असा येतो त्यामुळे तिचं आयुष्य संपूर्ण बदलून जातं.

‘छपाक’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांना ‘उयारे’ या चित्रपटाची आठवण झाली. त्यामुळे ‘उयारे’ चित्रपटातील पार्वती थिरुवोथुची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर नेटकरी तिच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. पार्वती ही दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने तेलुगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं आहे.


हेही वाचा – लता मंगेशकरांनंतर ‘या’ गायिकेला गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलं


 

First Published on: December 12, 2019 4:57 PM
Exit mobile version