सनी लिओनीला ओळखलं नाही, म्हणून स्पर्धक KBCचा लाखोंचा प्रश्न चुकला

सनी लिओनीला ओळखलं नाही, म्हणून स्पर्धक KBCचा लाखोंचा प्रश्न चुकला

सनी लिओनीला ओळखलं नाही, म्हणून स्पर्धक KBCचा लाखोंचा प्रश्न चुकला

सोनी वाहिनीवरील ‘कौन बनेगा करोडपती’चा १२ सीझन सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. आज रोल ओव्हर स्पर्धक रचना त्रिवेदी हॉट सीटवर विराजमान झाली आहे. पण एका कन्फ्यूजनमुळे रचना ३ लाख २० हजार रुपये घेऊन या स्पर्धेतून बाहेर गेली आहे. दरम्यान गुजरातमधील राजकोट येथे राहणारी रचना त्रिवेदीने आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी केबीसीमध्ये अभिताभ बच्चन यांच्यासोबत शेअर केल्या आहेत. रचनाच्या या गोष्टी ऐकून बिग बी तिच्यावर इम्प्रेस झाले आहेत. रचनाला फिरायला खूप आवडते आणि तिने आतापर्यंत १२ देशात प्रवास केला आहे. आज रचनाने आपल्या खेळाची सुरुवात सहाव्या प्रश्नापासून करते. यादरम्यान रचनाच्या फक्त तीन लाईफलाईन बाकी होत्या. पण १२व्या प्रश्नामुळे रचना केबीसीच्या स्पर्धेतून बाद झाली आहे. असा कोणता प्रश्न होता जो रचनाला आला नाही ते पाहा.

हॉटसीटवर रचनाला विचारले हे ६ प्रश्न

१. यापैकी एकाच दिवशी कोणत्या राज्याची स्थापना झाली?
उत्तर – महाराष्ट्र आणि गुजरात

२. ही कोणत्या गाण्याची सुरुवात आहे? (स्पर्धकाला गाण्याची ऑडियो क्लिप ऐकवली.)
उत्तर – द ब्रेकअप साँग

३. कोणत्या इंग्रजी कवितेमध्ये अ‍ॅडम आणि इव्हच्या उत्पत्तीचे वर्णन केले गेले आहे?
उत्तर – पॅराडाइज लॉस्ट

४. पोपट परिवाराशी संबंधित असलेल्या या पक्षाला ओळखा? (व्हिडिओ क्लिपसह प्रश्न)
उत्तर – मकाऊ
या प्रश्नासाठी रचनाने फ्लिप द क्वेश्चन या लाईफलाईनचा वापर केला. ज्यानंतर तिला वेगळा प्रश्न विचारण्यात आला.

जानेवारी २०२०मध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये कोणत्या माजी दिग्गज बास्केटबॉल खेळाडूचे निधन झाले होते?
उत्तर – कोबे ब्रायंट

५. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डचे मुख्यालय भारतात कुठे आहे?
उत्तर – आणंद

६. अभिनेत्री हरनीत कौरला आपण कोणत्या नावाने ओळखतो?
उत्तर – नीतू कपूर
या प्रश्नाचे उत्तर देताना रचना कन्फ्यूज झाली होती. तिने या प्रश्नाचे उत्तर देताना सनी लिओनीचे नाव घेतले होते, जे चुकीचे होते. या प्रश्नानंतर रचनी त्रिवेदीचा केबीसी-१२चा प्रवास संपला. रचनाने केबीसीमध्ये ३ लाख २० हजार रुपये जिंकले.


हेही वाचा – कोरोना काळात मदत केल्यामुळे सोनूवर कोट्यावधीचं कर्ज


 

First Published on: December 9, 2020 5:07 PM
Exit mobile version