Hana Horka: Covid-19 लसीकरण विरोधी मोहिमेतील सहभाग अंगलट, लस न घेतलेल्या गायिकेचा Corona ने मृत्यू

Hana Horka: Covid-19 लसीकरण विरोधी मोहिमेतील सहभाग अंगलट, लस न घेतलेल्या गायिकेचा Corona ने मृत्यू

Hana Horka: Covid-19 लसीकरण विरोधी मोहिमेतील सहभाग अंगलट, लस न घेतलेल्या गायिकेचा Corona ने मृत्यू

जगभरात आलेल्या कोरोना (Corona)  विषाणूशी लढण्यासाठी लसीकरण हे एक भक्कम हत्यार आहे. मात्र आजही अनेक जण लसीकरणाच्या विरोधात (anti-vaccine movement)  आहे. आजही अनेक जण याचा प्रचार करताना दिसतात. चैक गायिका हाना होरका (Czech singer Hana Horca)  देखील या मोहिमेत सहभागी झाली होती मात्र कोरोना लसीकरण मोहिम तिच्या अंलगट आल्याने तिला मृत्यूला सामोरे जावे लागले.  चैक गायिका हाना होरका हिचा कोरोनामुळे मृत्यू झाला. (Czech singer Hana Horca dies)  हाना लसीकरण विरोधी मोहिमेची सदस्य होती.

हाना होरकाचा मुलगा रेकने सांगितल्याप्रमाणे, हाना यांनी कोरोना विरोधी एकही लस घेतली नव्हती. मुलगा म्हणाला ‘मी आणि बाबा क्रिसमस पार्टीत कोरोना पॉझिटीव्ह आलो. आम्ही दोन्ही लसी घेतल्या होत्या.मात्र आईने एकही लस घेतली नव्हती. ती तेव्हा आमच्यासोबत राहत होती. त्यामुळे तिला कोरोनाची लागण झाली. तिचे प्रकृती दिवसेंदिवस बिघडली आणि अखेर तिची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली’.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, हाना होरका 57 वर्षांच्या होत्या. त्यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे सांगितले होते. मध्यंतरी तिची प्रकृती सुधारली होती. लवकरच मी एका संगीत समारंभाला हजेरी लावणार असल्याचे देखील तिने पोस्ट करत सांगितले होते आणि पोस्ट केल्याच्या दोन दिवसांनी तिचे निधन झाले.

मुलगा रेकने म्हटले आहे की, 16 जानेवारीला आईची प्रकृती सुधारली होती. त्यामुळे ती बाहेर जाण्यासाठी तयार झाली होती. तेव्हा तिच्या पाठीत जोरात कळा आल्याने ती पुन्हा रूममध्ये गेली आणि बेडवर झोपली आणि पुढच्या 10 मिनिटात तिने प्राण सोडला. आईला नेहमी वाटायचे की, मी कोरोनातून बरी झाली आहे त्यामुळे मला लस घेण्याची गरज नाही.


हेही वाचा –  Bharti singh : देशातील पहिली प्रेग्नंट अँकर असल्याचा भारती सिंगचा दावा; म्हणे…

 

 

 

First Published on: January 20, 2022 10:35 AM
Exit mobile version