दिया मिर्झाच्या घरी चिमुकल्याचे आगमन, जीवघेण्या इंफेक्शनमुळे करण्यात आली Premature डिलीवरी

दिया मिर्झाच्या घरी चिमुकल्याचे आगमन, जीवघेण्या इंफेक्शनमुळे करण्यात आली Premature डिलीवरी

दिया मिर्झाच्या घरी चिमुकल्याचे आगमन, जीवघेण्या इंफेक्शनमुळे करण्यात आली Premature डिलीवरी

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाच्या घरी नुकतंच एका चिमुकल्याचे आगमन झाले आहे. दियाने ही आनंदाची बातमी चाहत्यांसाठी शेअर केली आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. काही महिन्यांपूर्वीच दिया मिर्झाचा वैभवरेखीसोबत विवाह झाला. यानंतर अवघ्या ६ महिन्यातचं दियाने आनंदाची बातमी दिली. संपूर्ण प्रवासात साथ दिल्याबद्दल दियाने हितचिंतकांचे आभार मानले आहेत. दिया आणि वैभवने मुलाचे नाव अव्यान ठेवले आहे. एका जीवघेण्या इंफेक्शनमुळे दियाची Premature डिलीवरी करण्यात आली आहे.

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दियाने ही बातमी चाहत्यांना दिली आहे. मुलाने हात पकडल्याचा फोटो दियाने शेअर केला आहे. दियाने जवळपास दोन महिन्यानंतर ती आई झाल्याची बातमी जग जाहीर केली. १४ मे रोजी तिने या गोंडस बाळाला जन्म दिला असून तिचा मुलगा आता २ महिन्यांचा झाला आहे. नऊ महिने पूर्ण होण्याधीच अव्यानचा जन्म झाला आहे. दियाचा प्रेमॅच्युअर बेबी असल्याने त्याला लहान मुलांच्या ICU वॉर्डमध्ये डॉक्टर आणि नर्सच्या देखरेखी खाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान डॉक्टर आणि नर्स त्याची विशेष काळजी घेतल्याची माहितीही दियाने दिली आहे.

जीवघेण्या संसर्गामुळे लवकर करण्यात आली प्रसूती

दिया मिर्झाने आपल्या Premature डिलीवरीबद्दल सांगताना लिहिले की, गर्भधारणेदरम्यान तिला एका जीवघेणे इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे तिला त्रास होऊ लागला. तिची प्रकृती अधिकचं खालावलत गेली. ज्यामुळे तिचा जीवाला अधिक धोका निर्माण झाला. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी उपचार करत सिझरिंग (C – section) पद्धतीने तिची डिलीवरी करत बाळाला जन्म दिला. त्यामुळे ६ व्या महिन्यातच बाळ जन्माला आलं. या बाळाच्या सुरक्षेसाठी त्याला ICU मध्ये ठेवण्यात आले आहे. असं दियाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दियाने पुढे एक भावनिक पोस्ट लिहिल म्हटले की, तिचा नवरा वैभव रेखा घरी चिमुकल्याचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे. तर त्याचे आजी, आजोबा आणि बहीण समायराही बाळाचा कुशीत घेण्यासाठी वाट पाहत आहेत. या पोस्टमध्ये तिने तिच्या मुलाचं नावही जाहीर केलं आहे. तसेच ज्या डॉक्टर्स आणि नर्सेसचा तिला आधार मिळाला त्यांचे ही आभार मानत आपला आनंद शेअर केला आहे. तर अजूनही आपलं बाळ आयसीयुमध्ये असल्याचंही तिने म्हटलं. दिया मिर्झाने १६ फेब्रुवारी २०२१ उद्योजक वैभव रेखीसोबत (Vaibhav Rekhi) दुसरं लग्न केलं. या लग्नानंतर १४ मे रोजी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.


ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांमध्ये वाढतोय ‘Eyes Syndrome’ चा धोका; जाणून घ्या लक्षणे आणि बचावाचे उपाय


 

First Published on: July 14, 2021 5:23 PM
Exit mobile version