Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर लाईफस्टाईल ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांमध्ये वाढतोय 'Eyes Syndrome' चा धोका; जाणून घ्या लक्षणे आणि...

ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांमध्ये वाढतोय ‘Eyes Syndrome’ चा धोका; जाणून घ्या लक्षणे आणि बचावाचे उपाय

२०- २० चा फॉर्म्यूला ठरतोय प्रभावी

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था पूर्णपणे बंद आहेत. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये यासाठी ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा मोबाईल, टीव्ही टॅब्लेट, लॅपटॉप, कम्प्युटरचा वापर पूर्वीपेक्षा दुप्पट वाढला आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी ही उपकरणे चांगली असली तरी याचे दुष्परिणाम आता मुलांच्या आरोग्यावर दिसत आहे. सतत दोन ते तीन तास सुरु असलेल्या ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांमध्ये ‘डिजिटल आय सिंड्रोम’ (Digital Eye Syndrome) ची लक्षणे वाढत आहेत. डोळ्यांना अधिक वेळ ओलावा मिळाला नाही तर डोळ्यांना खाज येणे आणि पाणी येण्याची समस्या सुरू होते. यास ‘आय सिंड्रोम’ (Eyes Syndrome) म्हणतात.

‘Digital Eye Syndrome’ हा आजार सतत मोबाइल, लॅपटॉप, टॅब्लेटच्या वापरामुळे अधिक वाढत आहे. लाला लाजपत राय (एलएलआर) रुग्णालयात डिजिटल आय सिंड्रोमची दररोज १५ ते १८ प्रकरणे समोर येत आहेत. त्यापैकी निम्म्याहून अधिक रुग्ण हे शालेय विद्यार्थी आहेत, तर एक तृतीयांश अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा इतर क्षेत्रात काम करणारे आहेत.

‘ही’ आहेत लक्षणे

- Advertisement -

डोळ्यांत जळजळ, खाज, भुरकटपणा, डोळे चोळण्याची गरज भासणे, डोळ्यातून पाणी येणे. अंधुक दिसणे, वेदना, नजर कमजोर होणे ही लक्षणे आढळत आहेत. तुमच्या पाल्यांमध्ये अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा.

मोबाइलमुळे त्रास वाढतोय अधिक

मोबाईलच्या सततच्या वापरामुळे मुलांमध्ये ही समस्या सर्वाधिक वाढतेय. त्याचे पहिले कारण म्हणजे मोबाईलची छोटी स्क्रीन, दुसरे म्हणजे मुले अभ्यासाबरोबरच ऑनलाइन गेम खेळणे आणि अधिक वेळ कार्टून खेळण्यास अधिक वेळ मोबाईलवर घालवत आहेत. मोबाईलच्या छोट्या स्क्रीनमुळे मुलांच्या डोळ्यावर अधिक ताण पडत आहे. अशी माहिती जीएसवीएम मेडिकल कॉलेजच्या नेत्ररोग विभागातील सहयोगी प्राध्यापक. शालिनी मोहन यांनी दिली.

२०- २० चा फॉर्म्यूला ठरतोय प्रभावी

- Advertisement -

डॉक्टरांच्या मते, Digital Eye Syndrome ची समस्या टाळण्यासाठी २०- २० चा फॉर्म्यूला अधिक प्रभावी ठरत आहे. यात २० मिनिटांसाठी स्क्रीन पाहिल्यानंतर आपण कमीतकमी २० सेकंदासाठी २० फूट अंतरावर पाहिले पाहिजे. यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो. तसेच अभ्यास करताना मोबाईल, लॅपटॉप, टॅब्लेटपासून निश्चित अंतरावर बसले पाहिजे. त्यामुळे डोळ्यावर जाणवणारा ताण कमी होईल. परंतु सततच्या मोबाईल, लॅपटॉप वापरामुळे डोळ्यांना त्रास होत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

‘हे’ आहेत उपाय

कामापुरती कम्प्युटर, मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर करा. जास्तवेळ टीव्ही पहाणे टाळा. डोळ्यांना थेट हवा लागू देऊ नका. प्रदूषण आणि उन्हात चष्मा वापरा. जास्त वेळ कम्प्युटरवर काम करत असाल तर अधूनमधून काम बंद करून डोळ्यात गुलाबजल टाका आणि थंड पाण्याने डोळे धुवा. आहारात सर्व पोषक तत्वांचा समावेश करा. यासाठी गव्हाचे तृण, बदाम, केळे, बेदाणे, अंजीर आणि एवाकाडो सेवन करा. व्यायाम करा.


 

- Advertisement -