वयाच्या ४३ व्या वर्षी फराहने घेतला आई होण्याचा निर्णय

वयाच्या ४३ व्या वर्षी फराहने घेतला आई होण्याचा निर्णय

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका आणि चित्रपट निर्माती फराह खान यांनी वयाच्या ४३ व्या वर्षी आई होण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात फराह खान यांनी एक पत्र देखील लिहिले आहे. त्यात असे म्हटले की, आयव्हीएफद्वारे आई होण्याच्या निर्णय घेतला आहे. फराह तीन मुलांची आई असून या तीन मुलांची नावे अन्या, कजार आणि डीवा असे आहे. फराह यांना तिळं मुल झाल्याने त्यांची तीन मुले आता १२ वर्षांची आहेत.

फराह यांनी पत्रात असे लिहिले की, ”एक मुलगी, पत्नी आणि आई या नात्याने मला माझे निर्णय घ्यावे लागले ज्यामुळे मी एक नृत्यदिग्दर्शिका, चित्रपट निर्माती बनले. प्रत्येक वेळी जेव्हा मला वाटतं की मी बरोबर आहे, तेव्हा मी माझा अंतर्गत आवाज ऐकला आणि पुढे जाऊन तसे निर्णय घेत आली आहे. आपण लोकांच्या निर्णयाबद्दल बराच विचार करतो, मात्र आपण आपले जीवन जगत असताना नेहमी विसरतो की जीवन आपले आहे आणि निर्णय घेण्याचा अधिकारही आपला आहे. ”

त्यांनी असेही लिहिले की, “माझ्या निर्णयामुळे आज मी तीन मुलांची आई आहे. यासह विज्ञान-तंत्रज्ञानाबद्दल मला आभार व्यक्त करायचे आहेत. मी आयव्हीएफद्वारे हे करू शकले आणि आताच्या वयात मी आई होऊ शकले. सध्याच्या युगात बर्‍याच स्त्रिया भीती न बाळगता असे करण्याचा निर्णय घेत आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे.”

यासह फराह यांनी असेही लिहिले की, नुकताच मला सोनी टीव्हीच्या शोच्या स्टोरी ९ मंथ्स बद्दल जेव्हा माहिती मिळाली तेव्हा, हा शो एक प्रामाणिक प्रतिक्रिया देताना दिसतो. जर प्रेमाशिवाय लग्न होऊ शकते तर पती शिवाय आई का होता येऊ नये? फराहने लिहिले की केवळ आपले निर्णयच आपल्याला पूर्ण करत असतात. वयाच्या ४३ व्या वर्षी मी आयव्हीएफ आई बनू शकली आणि मला याचा अभिमान आहे.


‘या’ सीनमुळे ‘अ सूटेबल बॉय’ आणि ‘नेटफ्लिक्स’वर कारवाई होणार!

First Published on: November 24, 2020 4:28 PM
Exit mobile version