Friendship Day 2023 : निखळ मैत्री दाखवणारे ‘हे’ आहेत बॉलिवूडमधील सिनेमे

Friendship Day 2023 : निखळ मैत्री दाखवणारे ‘हे’ आहेत बॉलिवूडमधील सिनेमे

प्रत्येक वर्षी ‘फ्रेंडशिप डे’ ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. यावरुनच असे कळते की, हा दिवस मैत्रीच्या नात्याला समर्पित असतो. मैत्रीचं नातं हे खूप प्रामाणिक, नितळ आणि भक्कम असतं. मैत्रीत कोणत्याही प्रकारची भिंती नसते. भारतात मैत्राला फार महत्व आहे. मैत्रीमधला हाच बॉण्ड बॉलिवूड चित्रपट आणि गाण्यांमध्येही दिसतो. बॉलिवूड मधील मैत्रीवर आधारित 5 चित्रपटांबद्दल जाऊन घेऊया.

 

 

 

हिंदी चित्रपट सृष्टीमधील ‘शोले’ हा अत्यंत लोकप्रिय मानला जातो.  शोले या चित्रपटाने आणि चित्रपटातील कलाकारांनीही प्रेक्षसकांची मनं जिंकली, शोले चित्रपटाची गाणी आणि संवाद आजही प्रेकक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटातील जय – वीरूची जोडी तर बॉलिवूड मधील एक खास जोडी मानली जाते. जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी शोले या चित्रपटातून मैत्रीची वेगळी ओळख करून दिली. बॉलिवूडच्या या दोन दिग्गज अभिनेत्यांनी जय आणि वीरू त्याचबरोबर ;ये दोस्ती हम नाहीं तोडेंगे’ हे गाणं अजरामर केलं आहे.

‘जिंदगी कैसी पहेली हैं’ हे गाणं असलेला आनंद चित्रपट 70 च्या दशकात खूपच हिट ठरला. सुपरस्टार राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आजही तेवढाच प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. कॅन्सर झालेला आनंद (राजेश खन्ना) आणि त्याचा आजार माहित असलेला डॉक्टर भास्कर (अमिताभ बच्चन) या दोघांमध्ये झालेली सहा महिन्यातली मैत्री ह्यात दाखविण्यात आली आहे. ‘जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नहीं’, ‘आनंद मरा नहीं’, ‘आनंद मरते नहीं’ या संवादाने आयुष्य जगण्याची दृष्टी बदलते.

all is well म्हणत आपल्या मित्रांच्या पाठीशी भक्कम पणे उभा असलेला थ्री इडियट्स मधला रँचोने या चित्रपटामधून मैत्रीची वेगळी व्याख्या सांगितली. रँचो, फरहान आणि राजू हे तीन मित्र शिक्षणानिमित्त कॉलेजमध्ये भेटतात आणि आणि त्यांच्या मैत्रीच्या प्रवासाची सुरुवात झाली. या तीन मित्रांची मैत्री भारतीय प्रेक्षक कधीच विसरू शकणार नाहीत.

 

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅनची इमेज मिळवून देणारा चित्रपट म्हणजे जंजीर. या चित्रपटात अमिताभ यांना साकारलेला इन्सपेक्टर विजय आणि त्यातला शेर खान अर्थात प्राण या दोघांची मैत्रीही तितकीच अजरामर ठरली आहे. ‘यारी हैं इमान मेरा यार मेरी जिंदगी’, हे गाणं आजही प्रेक्षकांना मध्ये लोकप्रिय आहे.

ऋतिक रोशन, अभय देओल, फरहान अख्तर यांच्या मुख्य भूमिका असलेला जिंदगी ना मिलेगी दोबारा ह्या मैत्रीवर आधारीत चित्रपटात या तीन मित्रांची एक वेगळीच केमिस्ट्री दिसते. हे तीनही मित्र मुसाफिरी करत एकमेकांना साथ देत त्यांच्या परदेश सफारीतील काही दिवस एकमेकांसोबत एन्जॉय करतात. हा चित्रपट या चित्रपटात फरहान अख्तर म्हणत असलेल्या शायरी सुद्धा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात.


हेही वाचा :

Friendship Day: ऑगस्टच्या पहिल्या रविवारी का साजरा केला जातो फ्रेंडशिप डे?

First Published on: August 5, 2023 5:30 PM
Exit mobile version