ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार सुपुर्द ए खाक, चाहत्यांनी भरल्या डोळ्याने दिला अखेरचा निरोप

ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार सुपुर्द  ए खाक, चाहत्यांनी भरल्या डोळ्याने दिला अखेरचा निरोप

ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार सुपुर्द ए खाक, चाहत्यांनी भरल्या डोळ्याने दिला अखेरचा निरोप

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते, ट्रॅजडी किंग दिलीप कुमार(९८) यांचे आज सकाळी निधन झाले. गेले अनेक दिवस श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर सकाळी ७.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर सकाळी १० च्या सुमारास त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या पाली हिल येथील निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी दिलीप साहेबांच्या अखेरच्या दर्शनासाठी बॉलीवूडसह राजकीय क्षेत्रातील अनेक नामवंतानी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि दिलीप कुमार यांचे मित्र शरद पवार यांनीही दिलीप कुमार यांचे अंतिम दर्शन घेत सायरा बानो यांचे सांत्वन केले. (Funeral of Tragedy King Dilip Kumar)

शबाना आजमी,अनुपम खेर, विद्या बालन, अनिल कपूर, रजा मुराद, शाहरुख खान, रणबीर कपूर, धर्मेंद्र, करण जोहर, यांनीही दिलीप कुमार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अंतिम दर्शन घेतले. तर आपल्या लाडक्या दिलीपकुमार साहेबांना शेवटचे डोळे भरून पाहण्यासाठी चाहत्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. यावेळी बीग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चननेही दिलीप कुमार यांचे अंतिम दर्शन घेतले.


शासकीय इतमामात त्यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात आले होते. संध्याकाळी पाच वाजता शोकाकुल वातावरणात जुहु येथील कब्रस्थानात दिलीप कुमार यांचा दफनविधी करण्यात आला. यावेळी दिलीप कुमार यांच्या मागे सतत सावलीसारख्या असणाऱ्या सायरा बानो यांनी शोकाकुल होत दिलीप साहेबांना अखेरचा सलाम केला.


हेही वाचा – बाळासाहेब ठाकरे आणि दिलीप कुमार यांच्या मैत्रीत ‘या’ घटनेमुळे आला दुरावा

 

 

First Published on: July 7, 2021 6:38 PM
Exit mobile version