घरमनोरंजनबाळासाहेब ठाकरे आणि दिलीप कुमार यांच्या मैत्रीत 'या' घटनेमुळे आला दुरावा

बाळासाहेब ठाकरे आणि दिलीप कुमार यांच्या मैत्रीत ‘या’ घटनेमुळे आला दुरावा

Subscribe

'मातोश्री'वर रंगायचे गप्पांचे फड

बॉलिवूडचे ट्रेजेड किंग म्हणून ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी मुंबईत आज अखेरचा श्वास घेतला. ते ९८ वर्षांचे होते. गेला काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आज सकाळी ७.३० दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूडप्रमाणेच दिलीप कुमार यांचे राजकारणाशीही जवळचे संबंध होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आणि दिलीप कुमार यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. परंतु बाळासाहेब ठाकरेंसोबतची त्यांची मैत्री घट्ट होती. परंतु त्यांच्या मैत्रीत फूट पडण्यासाठी एक घटना कारणीभूत ठरली.

बाळासाहेब ठाकरेंनी एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता, मी आणि दिलीप कुमार मातोश्रीच्या जुन्या गच्चीवर गप्पा मारत बसायचो. महिलांना बारस्याच्या वेळी मिळणाऱ्या घुगऱ्या मा तळायची त्यात ती खोबर आणि कोथिंबीर घालायची. मी त्यावेळी बिअर पित होतो आणि गच्चीवर बसलो होतो. त्यामुळे दिलीप कुमार येऊन म्हणाला की,  मी त्याला म्हटले ये. आम्ही दोघे गच्चीत बसून चणे खात होतो. दिलीपला ते चणे भयंकर आवडले. त्यानंतर अनेकदा तो फोन करून विचारायचा की मी तुमच्याकडे चने खायला येऊ का? मी म्हणायचो ये त्यात काय अशी प्रकारची आमची मैत्री होती,” असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

परंतु दिलीप कुमार यांच्यासोबतची मैत्री तुटण्याबाबत बाळासाहेबांनी सांगितलं की, “जेव्हा दिलीपला १९९७ मध्ये पाकिस्तान सरकारचा ‘किताब ए पाकिस्तान’ पुरस्कार आणि सन्मानासाठी त्याला पाकिस्तानात बोलावलं होतं. यावेळी मी मैत्री तोडली. त्याची आणि सुनील दत्तशी मैत्री तोडली कारण तो दिलीपसोबत गेला होते. मी म्हटलं मला नाही आवडलं हे तुला हिंदुस्तानने मोठं केलं पाकिस्तानने नाही.”

तेव्हा बाळासाहेबांनी दिलीप कुमार यांच्यावर जाहीरपणे टीका केली. बाळासाहेब ठाकरेंचे पाकिस्तानबद्दल परखड विचार सर्वांनाच ज्ञात होते. कारगिल युद्धानंतर बाळासाहेबांनी दिलीप कुमार यांना पाकिस्तानने दिलेला पुरस्कार परत देण्यास सांगितले. त्यावेळीही दिलीप कुमार यांनी त्यांना स्पष्टपणे नकार दिला. हा पुरस्कार माझ्या सामाजिक कार्यासाठी दिला आहे. भारत आणि पाक यांना जवळ आणण्यासाठी मिळाला आहे असं दिलीप कुमार म्हणाले. या कारणांमुळे दोघांच्या मैत्रीत दुरावा आला. कालांतराने दोघांमधील वाद संपुष्टात आले आणि पुन्हा मैत्री जपली.

- Advertisement -

जेव्हा दिलीप कुमार यांनी ७ ऑस्कर अवाॅर्ड जिंकणारे हॉलीवूड चित्रपट नाकारले….


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -