‘गदर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; नेटकऱ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

‘गदर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; नेटकऱ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ चित्रपटाला त्या काळी प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास करोडोंची कमाई केली होती. अनिल शर्मा यांच्या या चित्रपटाचे यश पाहून यंदा या चित्रपटाचा दुसरा पार्ट ‘गदर 2’ देखील प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेते सनी देओल आणि अमीषा पटेल मुख्य भूमिकेत असतील तसेच अभिनेता उत्कर्ष शर्मा त्यांच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेत्री सिमरत कौर सनी देओलच्या सूनेच्या भूमिकेत दिसेल.

शुक्रवारी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ‘गदर’चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला. जो पाहून चाहते खूप खूश झाले आहेत. सोशल मीडियावर ‘गदर’चा ट्रेलर खूप व्हायरल होत आहे.

2001 मध्ये ‘गदर’ने कमावले होते इतके कोटी

सनी देओल आणि अमीषा पटेलच्या ‘गदर’ने 2001 मध्ये जवळपास 76.44 कोटी कमावले होते. हा चित्रपट 18.5 कोटींच्या बजेटमझध्ये तयार करण्यात आला होता. तसेच या चित्रपटाने जगभरातून एकूण 111.73 कोटी कमावले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘गदर 2’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून चित्रपट पोस्ट प्रॉडक्शनच्या टप्प्यावर आहे. या आधी हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात होतं मात्र, आता हा 9 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, हा चित्रपट तयार करण्यासाठी जवळपास 100 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. तर अभिनेता सनी देओलने चित्रपटासाठी 5 कोटी चार्ज केले आहेत. अमिषा पटेलने 2 कोटी चार्ज केले आहेत.


हेही वाचा :

शॉर्ट्स घालून शिव मंदिरात गेलेल्या मुलीची कंगनाने घेतली शाळा

First Published on: May 27, 2023 12:54 PM
Exit mobile version