गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ; सातारा न्यायालयाने दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ; सातारा न्यायालयाने दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश

लावणी कलाकार गौतमी पाटील गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. गौतमीच्या लावणीमुळे तिचे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत गौतमीने अनेक कार्यक्रम केले असून, तिच्या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने गर्दी होताना दिसते. तसेच सोशल मीडियावर देखील गौतमीच्या लावणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. दरम्यान, आता अशातच गौतमीच्या अडचणीत पुन्हा वाढ झाल्याची बातमी समोर येत आहे.

मागील अनेक दिवसांपासून अनेकजण गौतमीच्या लावणीवर टीका करत आहेत. प्रतिभा शेलार यांनी देखील गौतमी तिच्या नृत्यात अश्लील हावाभाव करत असल्याचे आरोप करत सातारा न्यायालयात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, आता त्यांच्या तक्राराची दखल घेत सातारा न्यायालयाने गौतमीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

गौतमीने आरोप फेटाळले
प्रतिभा शेलार यांनी केलेले आरोप गौतमीने फेटाळले आहेत. गौतमी म्हणाली की, “मी आधी या चूका केल्या होत्या परंतु मी आता यातील कोणतीही चूक करत नाही. मी जर चूक केली तर तुम्ही माझ्याविरोधात गुन्हा दाखल करु शकता. परंतु काहीही चूक नसताना उगाच माझ्यावर आरोप करुन माझे कार्यक्रम बंद करण्याची मागणी करणं अन्यायकारक आहे.”

 


हेही वाचा :

क्रिकेटर केएल राहुल आणि आथिया शेट्टी अखेर विवाहबंधनात; पाहा दोघांचे खास फोटो

First Published on: January 24, 2023 12:39 PM
Exit mobile version