क्रिकेटर केएल राहुल आणि आथिया शेट्टी अखेर विवाहबंधनात; पाहा दोघांचे खास फोटो

first pictures of kl rahul and athiya shettys wedding are out

बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी याची लेक आणि अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल अखेर आज विवाहबंधनात अडकले आहेत. सुनील शेट्टीच्या खंडाळामधील फार्महाऊसवर हा विवाह सोहळा पार पडला. दोघांच्या लग्नाला त्यांचे जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार असे मोजके पाहुणे हजर होते. फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघं  लग्नबंधनात अडकले आहेत. या जोडप्याच्या लग्नातील काही खास फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अथिया शेट्टीने प्रसिद्ध फॅशन डिझायनर अनामिका खन्ना यांनी डिझाइन केलेला पीच रंगाचा लेंहगा, चोली सेट परिधान केला होता, अथिया शेट्टीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. अथियाने पीच रंगाचा लेहेंगा घातला आहे तर राहुलने क्रीम रंगाची शेरवानी घातली आहे.


first pictures of kl rahul and athiya shettys wedding are out

आथियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघेही सात फेरे घेताना दिसत आहेत. हे फोटो पोस्ट करत अथियाने कॅप्शन लिहिले, “प्यार कैसे करूं… आज ज्या घराने आम्हाला खूप काही दिले त्या घरात आमच्या प्रियजनांसमोर आम्ही लग्न केलं. शुभेच्छा आणि प्रेमासह आमच्या या एकत्र प्रवासात तुमचे आशीर्वादही सोबत असू द्या.


first pictures of kl rahul and athiya shettys wedding are out

फोटोंमध्ये दोघांच्या चेहऱ्यावरील एकत्र असल्याचा आनंद दिसत आहे. एकमेकांचा हात धरून ते सात फेरे घेत आहेत. एका फोटोमध्ये राहुल अथियाच्या हातावर किस करताना दिसत आहे.


first pictures of kl rahul and athiya shettys wedding are out

दोघांनी गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट केलं आणि आज अखेर लग्न केलं. या दोघांच्या लग्नात दोन्ही कुटुंबातील खास लोकचं सहभागी झाले होते.first pictures of kl rahul and athiya shettys wedding are out