Video: ‘घरात बसले सारे’, बोलक्या बाहुल्या करणार तुमचं मनोरंजन!

Video: ‘घरात बसले सारे’, बोलक्या बाहुल्या करणार तुमचं मनोरंजन!

लॉकडाउनमुळे सर्व मालिकांचं चित्रीकरण पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे मालिकांचे जुने भाग, जुन्या काही मालिकांचं सध्या वाहिन्यांवर होत आहे. पण आता प्रतीक्षा संपली कारण झी मराठीवर लवकरच मर्यादित भागांची नवी मालिका. रामदास पाध्ये म्हटलं कि आपल्याला आठवतात ते बोलके बाहुले अर्धवट राव, आवडा अक्का आणि त्यांच्या गमती जमती, आता हेच ‘अर्धवट राव आणि आवडा अक्का, त्यांचा मुलगा चंदन, सून सुनयना आणि नातू छोटू सिंग सोबत घेऊन येत आहेत एक नवा कोरा कार्यक्रम ‘घरात बसले सारे’.

रामदास पाध्ये म्हणाले, “मी देश विदेशात या बाहुल्यांचे अनेक प्रयोग केले, पण डेली सोप मध्ये असा प्रयोग कधीच केला नव्हता. पण आता मी माझ्या बोलक्या मित्रांसोबत एक वेगळा प्रयोग करणार आहे. या लॉकडाऊन मध्ये हा कार्यक्रम साकारताना माझ्या फॅमिलीची म्हणजेच अपर्णा पाध्ये, सत्यजित आणि ऋजुता पाध्ये यांची खूप मदत झाली. सत्यजितने या बाहुल्यांना आवाज तर दिलाच पण त्याचसोबत या कार्यक्रमाच्या दिग्दर्शनाची धुरा देखील सांभाळली. या  मालिकेत चंदन आणि सुनयना यांच्यातील तू तू मै मै आणि त्यांच्या जीवनात घडण्याऱ्या मजेशीर गोष्टी या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळतील. ८ जून पासून प्रेक्षकांना या गमतीजमती पाहता येणार आहेत.


हे ही वाचा – ‘त्या एका गोष्टीमुळे अनेक प्रोजेक्ट हातातून गेले’, ‘या’ अभिनेत्रीने सांगितला अनुभव


 

First Published on: June 4, 2020 4:17 PM
Exit mobile version