Sanjeev kumar  : ‘या’ अटीमुळे हेमामालिनी यांनी संजीव कुमार यांचे प्रेम नाकारले

Sanjeev kumar  : ‘या’ अटीमुळे हेमामालिनी यांनी संजीव कुमार यांचे प्रेम नाकारले

Sanjeev kumar  : 'या' अटीमुळे हेमामालिनी यांनी संजीव कुमार यांचे प्रेम नाकारले

बॉलीवूडचे सुपरस्टार अभिनेता संजीव कुमार यांनी आपल्या सुपरहिट चित्रपटांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्यांनी कॉमेडीपासून ते अगदी गंभीर भूमिका साकारुन बॉलीवूड क्षेत्रात आपली दमदार कामगिरी बजावली. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांच्या चित्रपटांनी आणि त्यांच्या शैलीने एक जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार हयात नसले तरी त्यांच्या आयुष्यातील आणि चित्रपटसृष्टीतल्या वेगवेगळ्या किस्स्यांची सोशल मिडियावर नेहमीच चर्चा होत असते. संजीव कुमार यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत ‘सीता और गीता’, ‘हवा के साथ साथ’ आणि ‘शोले’सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. एकत्र काम करत असताना संजीव कुमार अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याप्रती प्रेमभावना निर्माण झाली. इतकंच नाही तर अभिनेता संजीव कुमार आपल्या आईसोबत अभिनेत्रीच्या घरी तिचा हात मागण्यासाठी गेले होते. मात्र इतकं होऊनही हेमामालीनी यांनी संजीव कुमार यांचे प्रेम नाकारले.

…म्हणून हेमामालिनी यांनी नाकारले प्रेम

संजीव कुमार यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या चरित्रानुसार, अभिनेत्याच्या आईलाही हेमा मालिनी खूप आवडत होत्या. पण लग्नानंतर त्याने बॉलिवूडमध्ये काम करावे असे त्याच्या कुटुंबियांना वाटत नव्हते. त्याचवेळी हेमा मालिनी यांच्या आई जया चक्रवर्ती यांनाही ही कल्पना अजिबात आवडली नाही. त्यामुळे हेमामालिनी यांनी संजीव कुमार यांचे प्रेम नाकारले.याशिवाय एका मुलाखती दरम्यान संजीव कुमार यांच्याबाबत म्हणाल्या की, संजीव कुमार यांना  त्याग करणारी पत्नी हवी होती,  जी आपल्या वृद्ध आईची काळजी घेईल, तिला आधार देईल. याशिवाय अशी पत्नी जी स्वत:च्या आधी परिवाराचा विचार करेल,अशा संजीव कुमार यांच्या पत्नीबाबत अपेक्षा होत्या. हेमा मालिनी यांनी संजीव कुमार यांच्याशी लग्न न करण्याचे कारण सांगताना पुढे म्हटले होते की, संजीव कुमार यांच्यातील परफेक्शनिस्ट नेहमीच आदर्श स्त्रीच्या शोधात असायचा. कदाचित यामुळेच संजीव कुमार कधीच स्थिरावू शकले नाहीत.

संजीव यांचे नाव सुलक्षणाशी जोडले गेले,अन्

त्यानंतर हेमामालीनी यांनी संजीव कुमार यांचा प्रस्ताव नाकारला. नंतर संजीव यांचे नाव सुलक्षणाशी जोडले गेले होते, पण त्यांनी सुलक्षणाशी लग्न केले नाही. चलते चलते’ या चित्रपटातून नावारुपास आलेल्या सुलक्षणा पंडित ७० च्या दशकात बॉलिवूडमधील आघाडिच्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या. मात्र प्रसिद्ध गायक पंडीत जसराज यांच्या कुटुंबातील सुलक्षणा आज अज्ञातवासात आयुष्य जगत आहेत.

संजीव कुमार यांचे वयाच्या ४७ व्या वर्षी १९८४ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. संजीव कुमार यांना दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.


हे ही वाचा –  बीएमसी घरावर हातोडा मारताना सपोटर्स कुठे होते ? कंगनाला विचारलेल्या प्रश्नावर आले उत्तर


 

 

First Published on: November 11, 2021 1:58 PM
Exit mobile version