ह्रतिक रोशनच्या हातात-हात घालून फिरणारी ‘ती’ मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?

ह्रतिक रोशनच्या हातात-हात घालून फिरणारी ‘ती’ मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?

ह्रतिकसोबत हातात हात घालून फिरणारी ती मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?

बॉलिवूडचा हँडसम हिरो अभिनेता ह्रतिक रोशन आपल्या पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतो. यात पुन्हा एका गोष्टीमुळे ह्रतिक रोशन चर्चेत आला आहे. सार्वजनिक ठिकाणी खूप कमी वेळा स्पॉट होणारा ह्रतिक आता असा काही स्पॉट झाला, की जे पाहून सोशल मीडियावर नव्या चर्चांना उधाण आले आहे. यामुळे ह्रतिक रोशन पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये असल्याचेही बोलले जाऊ लागले आहे.

अभिनेता ह्रतिक रोशन अलीकडेच एका रेस्टॉरंटमधून बाहेर येताना दिसला. मात्र त्यावेळी तो यावेळी एका मुलीसोबत दिसला. ह्रतिकसोबतची ती मुलगी त्याचा हातात हात धरून चालत होती. त्या दोघांचा हात धरून चालतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल झाला. त्यामुळे ह्रतिकच्या आयुष्यातील ही मिस्ट्री गर्ल कोण आहे अशा अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. ह्रतिकसोबत त्यावेळी त्याच्या बहिणी पश्मीना आणि सुनैना देखील उपस्थित होत्या. ते सर्व एकत्र डिनरसाठी गेले होते. मात्र यात फक्त ह्रतिकचा हात धरून चालणाऱ्या मुलीनेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्या मुलीने चेहऱ्यावर मास्क लावला असल्याने अनेकांना ती कोण आहे. हे ओळखणे कठीण झाले.

त्यामुळे ती मुलगी कोण आहे असा प्रश्न आता चाहते उपस्थित करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता हृतिक रोशनसोबत दिसलेली ती मुलगी दुसरी तिसरी कोणी अभिनेत्री आणि संगीतकार सबा आझाद असल्याचा दावा केला जात आहे.

सबा आझाद ही एक अभिनेत्री, थियेटर डिरेक्टर आणि संगीतकार आहे. तिने ‘मुझसे फ्रेंडशिप करोगे’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात काम केलं आहे. तसेच ती ‘दिल कबड्डी’ या चित्रपटात देखील दिसली होती.

शिवाय सबाने आत्तापर्यंत कॅडबरी, किट कॅट, व्होडाफोन, एअरटेल, पॉंड्स, सनसिल्क अशा अनेक जाहिरातींमध्ये काम केलेय. मात्र या डिनरनंतर आता हृतिक रोशन आणि सबा आझाद एकेमकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र ही मिस्ट्री गर्ल खरचं सबा आझाद आहे का हे येणारा काळचं सांगेल.

ह्रतिक रोशनच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास लवकरचं तो ‘विक्रम वेद’ या चित्रपटात झळकणार आहे. तमिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असणार आहे. यात राधिका आपटे आणि सैफ अली खान यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर दीपिका पदुकोणसोबत तो ‘फाइटर’ चित्रपटात काम करणार आहे.


लॉकडाऊन, सक्तीच्या लसीकरणाविरोधात कॅनेडियन नागरिक एकवटले, पंतप्रधानांचं मात्र पलायन


First Published on: January 30, 2022 3:00 PM
Exit mobile version