घरदेश-विदेशलॉकडाऊन, सक्तीच्या लसीकरणाविरोधात कॅनेडियन नागरिक एकवटले, पंतप्रधानांचं मात्र पलायन

लॉकडाऊन, सक्तीच्या लसीकरणाविरोधात कॅनेडियन नागरिक एकवटले, पंतप्रधानांचं मात्र पलायन

Subscribe

जगभरात कोरोना महामारीविरोधात अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र या लॉकडाऊन आणि सक्तीच्या लसीकरणाविरोधात कॅनेडियन नागरिक एकवटले आहेत. लॉकडाऊन आणि सक्तीच्या लसीकरणामुळे कॅनेडियन जनतेचा संपात अनावर झाला असून हजारोंच्या संख्येने कॅनेडियन जनता रस्त्यावर उतरली आहे. आंदोलक जनतेने थेट पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या ओटावा येथील निवासस्थानी हल्लाबोल केला आहे. आज सुमारे 50 हजार ट्रक चालकांनी 20 हजार ट्रक घेऊन पंतप्रधान ट्रुडो यांच्या निवासस्थानाला घेराव घातला आहे. कॅनेडियन जनतेचा वाढता आक्रोश पाहता पंतप्रधान ट्रुडो एका गुप्त ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. ट्रुडो यांच्या पलायनामुळे आंदोलकांचा संताप अनावर झाला असून आंदोलन तीव्र केले जात आहे. या आंदोलकांमध्ये लहान मुले, अपंग, वृद्ध  लोकांचाही समावेश आहे. मात्र या आंदोलनामुळे ओटावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आंदोलकांकडून या कोरोना निर्बंधांची तुलना फॅसिझमशी केली जातेय. तसेच आक्रमक आंदोलन कर्त्यांकडून कॅनडाच्या झेंड्यासह नाझीची प्रतिकही फडकवली जात आहे. तर यातील काही आंदोलकांनी थेट पंतप्रधान ट्रुडो यांच्यावर अश्लील भाषेचा वापर करत शिवीगाळ केली.

- Advertisement -

पंतप्रधानांनी सक्तीच्या लसीकरणाचा निर्णय मागे घेत, कोव्हिड निर्बंध शिथील करावे, तसेच पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अशा अनेक मागण्या आंदोलकांकडून करण्यात येत आहे. आंदोलकांमध्ये सर्वाधिक ट्रक चालकांचा समावेश आहे. ट्रक चालकांना लसीकरण बंधनकारक करण्यात आल्याने ट्रक चालक आंदोलनात उतरले आहे. अचानक उसळलेल्या या तीव्र आंदोलनामुळे आता पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांना आटोवा येथील निवासस्थानातून हलवून दुसऱ्या अज्ञात स्थळी सुखरुप नेण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधानांना एक दिवस आधीच अज्ञात स्थळी हलविण्यात आलेय. मात्र या आंदोलनकर्त्यांवर अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्य़ात आलेला नाही .

15 जानेवारीपासून कॅनडाच्या सीमेपार जाण्यासाठी ट्रक चालकांना लसीकरण सक्तीचे करण्याच आले होते. तसेच लसीकरण केल्याचे पुरावे दाखवणे बंधनकारक केले आहे. तर यात लसीकरण न केलेल्यांना अमेरिकेतून कॅनडाला आल्यानंतर आयसोलेशनमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच कोरोना चाचणी करणे सक्तीचे केले होते. अमेरिकेतील ट्रक चालकांनाही हा नियम लागू होता. मात्र या नियमामुळे वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका सहन करावा लागत होता. यामुळे अन्न पदार्थांचे भाव वाढले. याच कारणास्तव कॅनेडियन जनता आता रस्त्यावर कॅनेडियन सरकारविरोधात उतरली आहे.


Mahatma Gandhi Death Anniversary : महात्मा गांधींच्या पुण्यातिथीनिमित्त पंतप्रधान मोदी व राहुल गांधींसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -