Indian Film Festival of Melbourne: ‘मिर्झापूर 2’ ठरला बहुचर्चित क्राइम ड्रामा

Indian Film Festival of Melbourne: ‘मिर्झापूर 2’ ठरला बहुचर्चित क्राइम ड्रामा

Indian Film Festival of Melbourne: 'मिर्झापूर 2' ठरला बहुचर्चित क्राइम ड्रामा

अॅमेझॉन प्राईम व्हिडिओजने इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न (आईएफएफएम) 2021 मध्ये मोठे यश मिळवले असून यामध्ये अॅमेझॉन ओरिजिनल ‘द फैमिली मैन’ पासून ‘मिर्जापुर सीज़न 2’, ‘शेरनी’ आणि ‘सोरारई पोटरू’ आदी दर्जेदार सीरीज आणि चित्रपटांचा समावेश आहे. भारतीय कंटेंटच्या एका विस्तृत मनोरंजन श्रेणीला प्रदर्शित करणारा मेलबर्न येथील हा इंडियन फिल्म फेस्टिवल ऑस्ट्रेलियातील एक मोठा उत्सव असून तो भारतातील सर्वोत्तम मनोरंजनाला एका छताखाली आणतो.

या वर्षीच्या इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न (आईएफएफएम) 2021 मध्ये, ‘बेस्ट वेब सीरिज’ श्रेणीत भारताचा बहुचर्चित क्राइम ड्रामा मिर्झापूर सीझन 2 विजयी ठरला असून सूरीया सिवकुमार (Suriya Sivakumar) आणि विद्या बालन (Vidya Balan) यांनी अनुक्रमे ‘सोरारई पोट्रु’ (Soorarai Pottru) आणि ‘शेरनी’मधील आपल्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार पटकावला आहे. दुसऱ्या सीझनच्या यशस्वीतेनंतर, द फॅमिली मॅनमधील ‘श्रीकांत तिवारी’ मनोज बाजपेयीला ‘वेब सीरिजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष)चा पुरस्कार मिळवून दिला असून ‘द फॅमिली मॅन’ या गुप्तहेर थ्रिलरद्वारे यशस्वी डिजिटल पदार्पण करणाऱ्या, समंथा अक्किनेनी (Samantha Akkineni)ला, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच, मल्याळम कौटुंबिक ड्रामा, द ग्रेट किचनने ‘इक्वालीटी ऑफ सिनेमा’ (फीचर) श्रेणीमध्ये ओळख मिळवली आहे.(Indian Film Festival of Melbourne: ‘Mirzapur 2’ became a much talked about crime drama)

अमेझॉन प्राईम व्हिडिओने पटकावलेल्या पुरस्कारांची यादी:

• अमेझॉन ओरिजिनल सीरीज, मिर्जापुर सीजन 2 ‘सर्वश्रेष्ठ वेब सीरीज’

• ‘सर्वश्रेष्ठ प्रदर्शन’ (पुरुष): सूरीया सिवकुमार (Suriya Sivakumar) अमेझॉन ओरिजिनल मूवी ‘सोरारई पोट्रु’ (Soorarai Pottru) साठी

• ‘सर्वश्रेष्ठ फिल्म’: अमेझॉन ओरिजिनल मूवी ‘सोरारई पोट्रु’ (Soorarai Pottru)

• ‘सर्वश्रेष्ठ परफॉर्मेंस’ (महिला): विद्या बालन (Vidya Balan) ने अमेझॉन ओरिजिनल मूवी, शेरनी मधील भूमिकेसाठी

• ‘वेब सीरीज सर्वश्रेष्ठ परफॉर्मेंस’ (पुरुष): मनोज बाजपेयीने अमेझॉन ओरिजिनल सीरीज, ‘द फैमिली मैन’मध्ये श्रीकांत तिवारीच्या आपल्या शानदार प्रदर्शनासाठी

• ‘वेब श्रृंखला सर्वश्रेष्ठ परफॉर्मेंस’ (महिला): सामंथा अक्किनेनीने अमेझॉन ओरिजिनल सीरीज, द फैमिली मैन’ राजी च्या व्यक्तिरेखेतील आपल्या भूमिकेसाठी

• ‘इक्वालीटी ऑफ सिनेमा’ (फीचर): अमेझॉन प्राईम व्हिडीओवरील मल्याळम फॅमिली ड्रामा, ‘द ग्रेट किचन’साठी


हे हि वाचा – Bigg Boss OTT: करण जोहरवर स्पर्धकांनी लावला पक्षपाताचा आरोप

First Published on: August 24, 2021 3:55 PM
Exit mobile version