‘इंडियन आयडल मराठी’ २२ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

‘इंडियन आयडल मराठी’ २२ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

'इंडियन आयडल मराठी' २२ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

सोनी मराठी वाहिनीवर येत्या २२ नोव्हेंबर रोजी सुरू होणार्या ‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमाची सध्या फार चर्चा आहे. ‘अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा’ हे या कार्यक्रमाचे ब्रीदवाक्य आहे. प्रादेशिक भाषेत इंडियन आयडल पहिल्यांदाच सुरू होणार असून त्याला साजेसे असे परीक्षकही लाभले आहेत. संगीतविश्वातली एक नावाजलेली आणि लोकप्रिय जोडी अर्थातच महाराष्ट्राचे लाडके अजय-अतुल परीक्षकाच्या खुर्चीत दिसणार आहेत. मराठी आयडल आणि त्यातही अजय-अतुल हे परीक्षण करणार असल्याने रसिकांची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. आयडलच्या ऑडिशनला संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राला अभिमान वाटेल असेच एकापेक्षा एक कलाकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून ऑडिशनला आले होते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम गायक/गायिका महाराष्ट्राला मिळतील, यात शंका नाही.

अजय-अतुल यांनी मनोरंजनसृष्टीत खूप कष्टाने स्वतःचं वेगळं नाव कमवलं. त्यांच्या सांगीतिक प्रवासाचे रसिक साक्षीदार आहेत. आवाजाच्या आणि स्वरांच्या साथीने स्वतःच्या पायावर उभं राहू पाहणाऱ्या मुलांचं स्वप्न सोनी मराठी वाहिनीच्या माध्यमातून रसिकांना बघता येणार आहे. देशाचा अभिमान असलेले अजय-अतुल आता महाराष्ट्रासाठी आवाज शोधणार, ही उत्सुकतेची बाब आहे आणि या कार्यक्रमाची निर्मिती फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. ही संस्था करते आहे.. उत्कृष्ट स्पर्धक, अनुभवी परीक्षक यांना घेऊन सुरू होणारा हा सुरांचा प्रवास २२ नोव्हेंबरपासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर रसिकांना बघायला मिळणार आहे.


हे ही वाचा – Panvel-madgaon christmas special : पनवेल-मडगाव दरम्यान ख्रिसमस आणि नवीन वर्षात साप्ताहिक विशेष ट्रेन


 

First Published on: November 21, 2021 2:53 PM
Exit mobile version