आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते वामन भोसले यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते वामन भोसले यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते वामन भोसले यांनी वयाच्या 87 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला

आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते वामन भोसले याचं वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले आहे.आज सकाळी गोरेगाव मधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जण्याने चित्रपट सृष्टीमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. फिल्ममेकर मधुर भंडारक यांनी सोशल मीडियावर ट्विट करून त्यांच्या  निधनाची बातमी देत दुख: व्यक्त केलं आहे. वामन भोसले यांनी १९६९ साली आलेला ‘दो रास्ते’ या चित्रपटातून फिल्म एडिटर म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती. तसेच ‘इनकार’ या चित्रपटाकरिता त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होतं. या चार दशकांच्या कारकिर्दी दरम्यान त्यांनी सुभाष घई, शेखर कपूर, महेश भट्ट, गुलजार, राज सिप्पी, अनिल गांगुली, सुनील दत्त आदींसह अनेक नामांकित चित्रपट निर्मात्यांसोबत काम केलं होतं.
अनेक कलाकारांनी ट्विट करत वामन भोसले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. फिल्म मेकर सुभाष घई यांनी सोशल मीडियावर ट्विट करून लिहलं आहे की,” एक उत्कृष्ट फिल्म एडिटर ज्यांनी माझा पहिला चित्रपट ‘कालीचरण’ पासून ते ‘खलनायक’ चित्रपटांना एडिट केलं होत. त्यांनीच माला ‘ताला’ या चित्रपटाला एडिट करणायसाठी प्रेरित केलं. ते एक उत्तम शिक्षक होते. तुमच्या आत्म्याला शांति लाभो सर”

तसेच विक्रम भट्ट यांनी सुद्धा दुख: व्यक्त केलं लिहलं आहे की,” ते पहिले असे चांगले व्यक्ती होते ज्यांच्याशी इंडस्ट्री भेट झाली होती. चित्रपट एडिटिंग मध्ये त्यांचा हातखंड होता. ते माझे मित्र,त्वतवादी,निर्देशकरता होते. त्यांनी माला सगळ्या गोष्टी शिकवल्या. मी अग्निपथ चित्रपटामध्ये चीफ असिस्टन होतो तेव्हा माझी त्यंच्याशी पहिल्यांदा भेट झाली झाली होती. त्यांनी माला पंखामध्ये सामावून घेत फिल्म एडिटिंग चे काही पॉइंट शिकवले. त्या वेळेस कंम्प्युटर नसल्यामुळे काही वेगळ्या प्रोसेस चा अवलंब केला जात असे”


हे हि वाचा – मालदीवच्या रोमॅंटिक व्हॅकेशनहून परतले रणबीर आलिया

First Published on: April 26, 2021 7:34 PM
Exit mobile version