IRA KHAN : ईरा खानला साडीचे क्रेझ,आता नेसली आजीची साडी

IRA KHAN : ईरा खानला साडीचे क्रेझ,आता नेसली आजीची साडी

IRA KHAN : ईरा खानला साडीचे क्रेझ,आता नेसली आजीची साडी

सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान याची मुलगी आयरा खान इंडस्ट्री मधील प्रसिद्ध स्टार किड्समधील एक आहे. आयरा खान ही सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. याशिवाय तिचा फॅन फॉलोविंगही मोठ्या प्रमाणात आहे. काही दिवसांपूर्वी आयराने साडी नेसायला सुरुवात केली आहे. आयरा खान आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे यांनी रविवारी नटून-थटून फोटोशूट केले आहे. तिच्या फोटोला चाहत्यांच्या बऱ्याच कमेंट आल्या आहेत. दोघांचा हा अनोखा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. या फोटोमध्ये आयरा तिच्या आजीची साडी नेसलेली पाहायला मिळत आहे.

आयरा आणि नुपूरने इंस्टाग्रामवर त्यांचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. या क्यूट फोटोंमध्ये आयरा खान तिच्या आजीची सिल्क साडी परिधान करताना दिसत आहे. त्यांनी कपाळावर लाल रंगाची मोठी टिकली लावली आहे. त्याचवेळी तिची बॉयफ्रेंड नुपूर शिखर देखील फॅमिली मॅनप्रमाणे जीन्स-टी-शर्ट घातलेली दिसत आहे. या फोटोंमध्ये नूपूर आयराला किस करत आहे.हा फोटो शेअर करत आयरा खानने लिहिले, ‘किती सुंदर रंग आहे या साडीचा. रविवारी आजीची साडी नेसले आहे.मला या साडीबद्दल एवढंच माहीत आहे की ही साडी सिल्कची आहे.

आयराच्या चाहत्यांना तिचे फोटो खूप आवडले आहेत. आयराच्या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट केली, ‘तू किती क्यूट आहेस. ‘दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, ‘खूप सुंदर.’ एकाने लिहिले, ‘सुंदर मेक-अप, उत्तम फोटो आणि साडीही सुंदर आहे. खूप छान आयरा.’ यापूर्वी आयरा खानने बॉयफ्रेंड नुपूर शिखरच्या आईची साडी नेसली होती. ही खादी साडी नूपूरची आई प्रीतम शिखरे यांनी आयराला दिली होती.


हे ही वाचा – शेलार, भातखळकरांना गुजरात पेंग्विन म्हणायचे का? महापौरांचे भाजपावर टीकास्त्र


 

First Published on: January 31, 2022 2:35 PM
Exit mobile version