LockDown: व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे इरफान खानने घेतले आईचे अंतिम दर्शन

LockDown: व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे इरफान खानने घेतले आईचे अंतिम दर्शन

इरफान खान

बॉलिवूड अभिनेता इरफान खानची आई सईदा बेगम यांची शनिवारी प्राणज्योत मालवली. सईदा बेगम ८२ वर्षांच्या असून दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. गेल्या कित्येक दिवसांपासून त्या आजारी होत्या. शनिवारी त्यांचे निधन झाले असून घरातील सदस्यांनी त्याला अखेरचा निरोप दिला. यावेळी अभिनेता इरफान खान त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहू शकला नाही. सईदा बेगम यांचे निधन जयपूरमध्ये झाले, मात्र लॉकडाऊनमुळे इरफान मुंबईत अडकला होता. कोणताच पर्याय उपलब्ध नसल्याने असहाय्य झालेल्या इरफानने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाणावलेल्या डोळ्यांनी आईला अखेरचा निरोप दिला.

प्रकृती बिघडल्याने घेतला अखेरचा श्वास

जयपूर येथील राहत्या घरी सईदा बेगम यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, सईदा बेगम या स्वस्थ होत्या परंतु शनिवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर जयपूरमधील कर्बला मोड रामगड रोड येथे असणाऱ्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इरफान खानच्या कुटूंबियांनी असे सांगितले की, कोरोना व्हायरसमुळे देशभर लॉकडाऊन असल्याने इरफानला आपल्या आईच्या शेवटच्या भेटीसाठी देखील येता आले नाही, तसेच इरफान सध्या न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरने ग्रस्त असून या धोकादायक आजारावर तो उपचार घेत आहे.

दरम्यान, इरफान खान देखील बर्‍याच दिवसांपासून आजारी असून जून २०१७ साली तो उपचारासाठी परदेशात गेला होता. यानंतर त्याने सोशल मीडियावर चाहत्यांना आपल्या आजाराची बातमी दिली होती. गेल्या वर्षी २०१९ मध्ये त्याने परदेशातून घरी परतल्यानंतर आपल्या ‘इंग्लिश मीडियम’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते.


LockDown Effect: थायलंडमध्ये हजारो हत्तींवर उपासमारीची वेळ!
First Published on: April 27, 2020 3:07 PM
Exit mobile version