घरदेश-विदेशLockDown Effect: थायलंडमध्ये हजारो हत्तींवर उपासमारीची वेळ!

LockDown Effect: थायलंडमध्ये हजारो हत्तींवर उपासमारीची वेळ!

Subscribe

सर्व हत्तींना त्यांच्या गरजेनुसार अन्न मिळत नसल्याने ते अशक्त होत असून काही हत्तींचा मृत्यू होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले आहे. परंतु संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे माणसं तसेच जनावरांनाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे पर्यटन व्यवसायाला जे नुकसान पोहोचत आहे त्याची किंमत काही प्राण्यांना आपला जीव देत मोजावी लागत आहे. लॉकडाऊनमुळे थायलंडमधील सरकारने गेल्या महिन्यात आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली होती, त्यानंतर तेथील पर्यटनस्थळे निर्जन झाली. त्याचा सर्वात मोठा परिणाम तेथील हत्तींवर झाला. थायलंडमध्ये जवळपास ४ हजार हत्ती असून त्यांचा वापर पर्यटकांच्या सफारीसाठी करण्यात येतो.

लॉकडाऊनमुळे तेथे पर्यटकांवर बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत या जनावरांचे पालन-पोषण करणे अशक्य होत आहे. या हत्तींसाठी दररोज साधारण २०० ते ३०० किलो अन्नाची आवश्यकता असते, तसेच यासाठी अधिक खर्च देखील लागतो. या सर्व हत्तींना त्यांच्या गरजेनुसार अन्न मिळत नसल्याने ते अशक्त होत असून काही हत्तींचा मृत्यू होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

Corona: इटलीत संख्या घटली…महिन्याभरात सर्वात कमी मृत्यू!

…तर उपासमारीने हत्तींच्या मृत्यूंची शक्यता 

मिळालेल्या माहितीनुसार, जागतिक प्राणी संरक्षण (डब्ल्यूएपी)च्या मते, थायलंडमधील २००० हून अधिक पाळीव हत्तींना तातडीने मदतीची आवश्यकता आहे. जर त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतीही मदत मिळाली नाही तर या हत्तींचा उपासमारीने जीव जाऊ शकतो, असे सेव्ह द एलिफंट फाऊंडेशनचे संस्थापक लेक चॅलर्ट यांनी यांना सांगितले. दरम्यान, जानेवारीत कोरोनाचा पहिला रुग्ण मिळाल्यानंतर थायलंडमध्ये २ हजार ८२६ रुग्णांची नोंद झाली आहे, तर ४९ लोकांचा या कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -