नवाजुद्दीनआधी ‘हा’ अभिनेता साकारणार होता ‘ठाकरे’

नवाजुद्दीनआधी ‘हा’ अभिनेता साकारणार होता ‘ठाकरे’

बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक अर्थात ‘ठाकरे’ चित्रपटाचा सध्या सगळीकडे गाजावाजा आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दकीने चित्रपटात बाळासाहेबांची प्रमुख भूमिका साकारली आहे. नवाजुद्दीने अगदी हुबेहुब बाळासाहेब साकारल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहे. बाळासाहेबांसारखं प्रख्यात राजकीय व्यक्तिमत्व मोठ्या पडद्यावर साकारणं हे खरंच खूप मोठं आव्हान होतं. ‘बाळासाहेबांसारख्या बड्या आणि लोकप्रिय नेत्याच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागू न देता त्यांची भूमिका साकारणं हे खूप मोठं आव्हान होतं’, असं नवाजुद्दीनने स्वत: एका मुलाखतीदरम्यान सांगतिलं होतं. परंतु आवाज, मेकअप, गेटअप आणि नवाजुद्दीनचा दमदार अभिनय यां गोष्टींची उत्तम भट्टी जमल्यामुळे, प्रेक्षकांसमोर बाळासाहेब पुन्हा एकदा जिवंत झाले. ज्यांनी ‘ठाकरे‘ चित्रपट पाहिलेले बहुतांशी प्रेक्षक ‘नवाजुद्दीन ठाकरे म्हणून शोभला’ असं म्हणत त्याच्या अभिनयाची प्रशंसा करत आहेत. मात्र, चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुस्कर यांनी एक वेगळाच खुलासा केला आहे. ‘ठाकरे’ चित्रपटासाठी नवाजुद्दीनच्या आधी एका दुसऱ्या अभिनेत्याचं नाव नक्की करण्यात आलं होतं, असा खुलासा मापुस्कर यांनी केला आहे.

… तर इरफान असता ‘ठाकरे’

कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुस्कर यांनी एका खासगी वाहिनीला मुलाखत देतेवेळी सांगितले की, ‘अभिनेता इरफान खान ही आमची ठाकरे चित्रपटासाठीची पहिली निवड होती.’ ‘इरफान खान बाळासाहेबांची भूमिका ताकदीने निभावू शकेल असा आम्हाला विश्वास होता. निर्मात्यांनीही त्याच्या निवडीला मंजूरी दिली होती. मात्र, ऐनवेळी इरफानची तब्येत बिघडल्यामुळे आम्हाला त्याचं वगळावं लागलं’, असा खुलासा मापुस्कर यांनी केला. मापुस्कर यावेळी म्हणाले की, ‘मीनाताई ठाकरेंच्या भूमिकेसाठीही अमृता राव ही आमची पहिली निवड नव्हती. तिच्याआधी रसिका दुग्गलला मीनाताईंचा रोल ऑफर करण्यात आला होता. मात्र, रसिकाने ‘मंटो’ चित्रपटात नवाजुद्दीनसोबत काम केलं असल्यामुळे तिच्याऐवजी अमृता रावची निवड करण्यात आली.’ दरम्यान, नवाजुद्दिन सिद्दकी आणि अमृता राव यांच्या ठाकरे चित्रपटातील अभिनयाचं मापुस्कर यांनी आवर्जून कौतुकही केलं.

ठाकरे चित्रपट लोकांच्या पसंतीस उतला असून, बॉक्स ऑफिसवर चित्रपट कोटींच्या घरात कमाई करत आहे.

रसिका दुग्गल – अमृता राव

 

First Published on: January 27, 2019 3:19 PM
Exit mobile version